Uncategorized

ओलादुष्काळ जाहीर करा!महाविकास आघाडीची मागणी

(हेक्टरी 50 हजाराची मदत करावी ; शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी महाविकास आघाडीचे एसडीओला निवेदन )


शेख मुजाहिद

ससंपादक मो.7798306192

मागील तीन दिवसापासून सुरू असलेल्या अतिवृष्टी जन्य पावसामुळे, तालुक्यात पैनगंगा नदी,नाले यांना आलेल्या महापुराने झालेल्या, नुकसान खातर हेक्टरी 50 हजार आर्थिक मदत, ओला दुष्काळ जाहीर करावा, खरडून गेलेल्या शेत जमिनीला 50 हजार मोबदला द्यावा व तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा. अश्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या प्रश्नांवर काँग्रेस राष्ट्रवादी व सेना यांच्या महाविकास आघाडीने आज 1 वाजता उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

तालुक्यात मागील तीन दिवसापासून खरीप हंगामातील अतिवृष्टी, पैनगंगा नदी नाल्याला आलेला महापूर, यामुळे झालेली नुकसान भरपाई म्हणून, हेक्टरी 50 हजार रुपयाची मदत देऊन, ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा. नदी व नाल्याच्या महापुराने खरडलेल्या जमिनी दुरुस्तीसाठी, हेक्टरी 50 हजार रुपयाची मदत देण्यात यावी. महापुराने जनावरे व जनावराचे गोठे शेती अवजारे वाहून गेल्यामुळे, त्यांचा सर्वे करून आर्थिक मदत देण्यात यावी. शेती उपयोगी मोटार पंप व विहिरी बुजल्या गेल्याने, त्याबाबत आर्थिक मदत देण्यात यावी. पुरामुळे कॅनल फुठले असून, शेतीचे नुकसान झाले असल्याने, कॅनॉल दुरुस्ती करून देण्यात यावे. चालगणी कालव्यावरील ब्राह्मणगाव पर्जना, खरूस रस्त्यावरील पुलाची दुरुस्ती करून देण्यात यावी. कोर्टा, दराटी, चिखली वन या भागातील पुराच्या पाण्याने पडलेले भिंती, दुरुस्तीसाठी तात्काळ अनुदान देण्यात यावे. शेतमजूर व कामगारांना रोजगार अभावी आर्थिक मदत देऊन, रोजगार हमी योजना अमलात आणावी. पैनगंगा नदी काठावरील गावांना, उन्हाळ्यातील पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये, यासाठी राखीव कोटा मंजूर करण्यात यावा. दराटी, शिवाजीनगर येथील तांड्यामधील, तलावाची दुरुस्ती करून, नाल्याची खोलीकरण व सरळीकरण करण्यात यावे. मुख्यमंत्री सडक योजनेतून ब्राह्मणगाव, परजना, खरूस रस्त्याला मान्यता मिळाली असून, उंचवडद हा 1200 मीटरचा रस्ता, आपत्कालीन मार्ग मंजूर करण्यात यावा. अशा मागण्या सही महाविकास आघाडीतील नेते व पदाधिकारी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात धडकले असून, वरील बाबी साठी रीतसर निवेदन देण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तातू देशमुख, शहराध्यक्ष नंदकिशोर अग्रवाल, तालुकाध्यक्ष दत्तराव शिंदे, माजी आमदार विजयराव खडसे, गोपाल अग्रवाल, राम देवसरकर, साहेबराव कांबळे, कृष्णा देवसरकर, रमेश चव्हाण, प्रेमराव वानखेडे, राष्ट्रवादीचे राजू जयस्वाल, स्वप्नील कनवाळे, भीमराव चंद्रवंशी, सेनेचे सतीश नाईक, मोहनराव मोरे, बळीराम मुटकुळे, राजेश खामोनेकर, प्रदीप देवसरकर, बाळू अण्णा दुर्गमवार, सुधाकर लाहेवार, डॉ संजय माने, डॉ आनंतराव कदम, अजय महेश्वरी, भगवान देवसरकर, प्रकाश वाघमारे, सिद्धू जगताप, भैय्या पवार, किशोर भवरे, कविता पोपुलवाड, अवधूत शिंदे, सुरेश कवाने, गजानन देशमुख, ईश्वर गोस्वामी, सुभाषराव शिंदे, मोहन कोंडेवाड, मधुकर फटिंग, कल्याण राणे, गजानन ठाकरे, प्रभाकर कदम, दिलीप वानखेडे, अतुल पाटील, निर्गुण कदम, सुनील खडसे, नामदेव खडसे, प्रशांत भोळे, सोनू खातिब, तालिब शेख आदि, महाविकास आघाडीतील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!