Uncategorized

वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आ. नितेश राणे यांच्या विरुद्ध कारवाई करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे मागणी


शेख मुजाहिद

ससंपादक मो.7798306192


कळमनुरी / भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी अहमदनगर जिल्ह्यात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहे आमदार नितेश राणे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी हिंगोली यांना निवेदनद्वारे करण्यात आली.
भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे हे मुस्लिम समाजाबद्दल वारंवार वादग्रस्त वक्तव्य करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे याचप्रमाणे नुकतेच अहमदनगर जिल्ह्यात आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाला मस्जिद मध्ये घुसून मारणार असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे काही दिवसापूर्वी नाशिक जिल्ह्यात रामगिरी महाराजांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर (स.) यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य करून मुस्लिम समाजाचे भावना दुखवल्याबद्दल राज्यात रामगिरी महाराजांच्या विरोधात ५८ गुन्हे दाखल करण्यात आले आहे त्या वादग्रस्त रामगिरी महाराजांच्या समर्थन करून मुस्लिम समाजाला मस्जिद मध्ये घुसून

मारण्याच्या थेट सभेतुन धमक्या देणाऱ्या आमदार नितेश राणे यांच्याविरुद्ध कठोर कार्यवाही करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे वतीने जिल्हाधिकारी हिंगोली यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी कळमनुरी चे माजी उपनगराध्यक्ष मो. नाजीम रजवी,अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष सय्यद असद कादरी, माजी नगरसेवक हाकीम बागवान, सय्यद बबलु, शेख साजिद, इरफान पठाण, सय्यद मुजमील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!