संयुक्त पत्रकार संघाचे अध्यक्षपदी सुरेंद्रनाथ पंजाबराव दळवी तर सचिव पदी ज्ञानेश्वर लोखंडे यांनी निवड

शेख मुजाहिद ससंपादक मो. 7798306192
मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन म्हणून साजरी करण्यात येते. पत्रकार दिनाचे औचित्य साधून – संयुक्त पत्रकार संघ उमरखेड संघाची दरवर्षीप्रमाणे यावर्षीची नवीन कार्यकारीणीची निवड दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती उमरखेड चे विश्राम गृहात एकमताने गठित करण्यात आली.

संयुक्त पत्रकार संघाचे मार्गदर्शक श्री विलासराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली, मार्गदर्शक शिवाजीराव चव्हाण तसेच सल्लागार रितेश पाटील कदम यांच्या उपस्थितीत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सन २०२५-२६ या वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली सदर कार्यकारणी मध्ये संयुक्त पत्रकार संघाचे अध्यक्ष पदी सुरेंद्रनाथ दळवी तर सचिव पदी ज्ञानेश्वर लोखंडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्षपदी शेख इरफान शेख इसा तर सहसचिव विश्वास काळे,

कोषाध्यक्ष सुनील लोखंडे तर सोशल मीडियाप्रसिद्धी प्रमुख पदी नितीन सोनाळे यांची एकमताने निवड करण्यात आली. परिमल चिंचोलकर,शेख तहसीन शेख भिकन,सय्यद खाजा सय्यद मौला, गजानन वानखेडे, शेख मुजाहिद , विश्वास काळे, अतिश वटाणे, यांची सदस्य पदी निवड करण्यात आली. नवनियुक्त कार्यकारिणी चे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले संयुक्त पत्रकार संघाचे मार्गदर्शक विलासराव चव्हाण,

शिवाजीराव माने, मार्गदर्शनात लोकाभिमुख कार्य करण्यास सदैव तत्पर राहू असे प्रतिपादन नवीन कार्यकारिणीने केले आहे.