उमरखेड मध्ये सावित्रीच्या लेकीने काढली मशाल रॅली

चौकट : जिजाऊ ब्रिगेड व राजमाता जिजाऊ जन्मोत्सव कडून दरवर्षी प्रमाणे दशरात्रौत्सव महोत्सवाला सुरवात
सरोज देशमुख.
शेख मुजाहिद ससंपादक मो. 7798306192
उमरखेड :शिक्षणाची देवता भारतातील पहिली महिला शिक्षिका मुख्याध्यापिका स्त्री शिक्षणाच्या प्रणित्या विद्येची जननी व समस्त स्त्रियांना शिक्षणाची वाट दाखविणाऱ्या क्रांतीज्योती सावित्री फुले यांच्या 194 व्या जयंतीनिमित्त उमरखेड शहरातून भव्य मशाल रॅली जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश सहसचिव सरोज देशमुख यांच्या नेतृत्वात देशमुख महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीसह महिला भगिनींनी भव्य मिरवणूक काढण्यात आली

उमरखेड छत्रपती शिवाजी महाराज चौक इथून रॅली काढण्यात आली यावेळी जय जिजाऊ, जय सावित्री, जय क्रांती, जय ज्योती अशा घोषणा करण्यात आल्या . जिजाऊ ब्रिगेड व जिजाऊ जन्मोत्सवाच्या सर्व महिला भगिनींनी ह्या रॅलीमध्ये सहभाग घेऊन आजच्या तरुणींनी सावित्रीबाई व जिजाऊ चे संस्कार मनात रुजून आचरणात आणावे अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या . ही मशाल रॅली महात्मा ज्योतिबा फुले चौक ते छत्रपति शिवाजी महाराज चौक, खडकपुरा वार्ड, नाकचौक, बसस्टड समोरून माहेश्वरी चौक ते छत्रपति चौक मध्ये समारोप. करण्यात आला या मशाल रॅलीत समिति सदस्य सरोज देशमुख , रजनी मुडे, शारदा धात्रक, यशोदा जोगदंड, रविता लकडे. शारदा खंदारे, सुरेखा पवार, शोभा राऊत,प्रा.जयमाला लाडे, वंदना मरसुळकर. रेखाताई भरणे, यांनी सहकार्य केलं व अनेक महिला मुली उपस्थीत होत्या. महात्मा ज्योतिबा फुले यांना चौक मध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करुन माशाल पेटुन रॅलीची सुरवात कऱण्यात आली.
