भीम सैनिक शहीद सोमनाथ सूर्यवंशी श्रद्धांजली सभा संपन्न

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उमरखेड शहरातील सर्व संविधानप्रेमी नागरिकांनी एकत्रीत येऊन परभणी येथील संविधान विटंबनेनंतर निघालेल्या निषेध मोर्चातील अंदोलकांना पोलीस प्रशासनाने वेगवेगळ्या कलमाखाली अटक करून अतोनात अत्याचार केला त्या अमानुष,अमानविय अत्याच्यारात मृत्यूमुखी पडलेल्या शहीद भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला गणेश मेंढे आणि उपस्थित ज्येष्ठाच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून झाली .
शहीद भिमसैनिक सोमनाथ ह्यांच्या फोटोला पुष्णमाला अर्पण व मेनबती प्रज्वलीत करून सर्वांनी भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली .
या श्रद्धांजली सभेत यशवंतराव काळबांडे, आत्माराम हापसे, महेंद्र कावळे सर, ऍड. शिवाजीराव वानखेडे, डॉ. प्रेम हनवते……. इत्यादीनी आपले विचार मांडून आपल्या भावना व्यक्त केल्यात.प्रा. डॉ. अनिल काळबांडे यांनी आपल्या समारोपिय भाषणातून या दुर्दैवी घटनेचा निषेध केला तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ससंदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी जी गरळ ओकली त्याचाही समाचार घेऊन त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
[“देशातील एकता, एकात्मता,शांतता आणि बंधुभाव नाहीसा करून समाजा समाजात तेढ निर्माण करण्यासाठी केलेले हे नियोजित कृत्य असून यामध्ये झालेल्या पोलीस मारहाणीत मृत्यूमुखी पडलेल्या ऍड. सोमनाथ सूर्यवंशी यास न्याय मिळाला पाहिजे…”
-डॉ. प्रेम हनवते ]
[संविधान प्रतिकाची विटंबना हे जाणीव पूर्वक घडवून आणलेले षडयंत्र असून देशात चालू असलेल्या ई व्ही एम विरोधी आंदोलनावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी केलेला डाव आहे. यासाठी जनरल डायर सारखा पोलीस बळाचा वापर करून सरकारने संविधान प्रेमी जनतेचा आवाज दाबान्याचा प्रयत्न केला आहेत.या दुर्दैवी घटनेचा आणि अमित शाह यांच्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो..!”-प्रा. डॉ. अनिल काळबांडे ]
या सभेचे सूत्रसंचालन प्रा. गजानन दामोदर यांनी केले तर संतोष निथळे यांनी उत्कृष्ठ नियोजन केले. या सभेला सुभाष वाठोरे, वीरेंद्र खंदारे, दादाराव आठवले, सदाशिव दुधडे,चेतन पतंगे, जि. एच. वाघमारे,प्रा . नंदकिशोर भगत, भीमराव आठवले, सुभाष वाठोरे, आत्माराम हापसे, भीमराव सोनुले, पांडुरंग धुळे,राहुल काळबांडे, दिलीप चव्हाण, धम्मदीप काळबांडे, दिलीप घोगरे, दत्ता मेंढे, शंकर पवार, संतोष निथळे,दशरथ राठोड,अविनाश मोरेश्वर,ललित कावळे,अभिजीत कावळे, महेंद्र कावळे, सुभाष दिवेकर, माधवराव पडघाने इत्यादी उपस्थित होते (सोबत फोटो )