Uncategorized

रात्रीची पोलिस गस्त ठरत आहे सेल्फी पॉइंट रात्री चोरीचे व तस्करांचे प्रमाण वाढले

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड शहराच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सध्या जागोजागी पोलिस प्रशासनाच्यवतीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून; हे सीसीटीव्ही कॅमेरे फक्त शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. एकंदरीत शहरात चोरांचा धुमाकूळ सुरू आहे. तर दुसरीकडे गुटखा व रेती तस्कर आपल्या खबऱ्याच्या साह्याने रात्रीच्या वेळी अवैध व्यवसाय बिनदिक्कतपणे तडीस नेत आहेत. तर पोलिस प्रशासनाच्यावतीने होणारी रात्रीची गस्त फक्त ठराविक पॉईंटवर जाऊन सेल्फी काढून वरिष्ठांना आपली हजेरी दाखवण्याची एक संधी दिसत आहे.

रात्री पोलिस पेट्रोलिंग करणारे कर्मचारी ठराविक पॉईंटवर जातात व सेल्फी काढून वरिष्ठांच्या व्हाट्सअप ग्रुपला पाठवतात व केलेल्या पेट्रोलिंगचा पुरावा देत, आपला कार्याला पाठ दाखवतात. तसेच या सर्व घडामोडीमुळे रात्रीची होणारी ठराविक पेट्रोलिंग गुटखा व रेती तस्कराला पाठबळ देत आहे. शहरातील मागील अनेक दिवसांपासून रात्री व दिवसाही बसस्थानक परिसरात चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. रात्रीच्या वेळी महिला व वयोवृद्ध लोक प्रवास करायला धास्तावतांना दिसत आहे.

त्यामुळे गुटखा व रेती तस्करांना ठराविक पेट्रोलिंग करून पाठबळ देण्याचे काम पोलिस करत आहे का? असा प्रश्न शहरातील नागरिक उपस्थित करीत आहेत. अतिसंवेदनशील असलेल्या उमरखेड शहरात सार्वजनिक व धार्मिक स्थळावर सुद्धा पोलिसांची पेट्रोलिंग होताना दिसत नाही. शहराच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिस प्रशासनाच्यावतीने सतर्कपणे काम होतांना दिसत नाही. तसेच मागील काळात उमरखेडचे ठाणेदार राहिलेले शंकर पांचाळ यांनी पुन्हा उमरखेड पोलिस स्टेशनची धुरा सांभाळत आहेत. परंतु, एकंदरीत पोलिसांच्या गस्तची अवस्था पाहता, पोलिस स्टेशनच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे राहतांना दिसत आहे. शहरातील मागील अनेक दिवसांपासून रात्री व दिवसाही बसस्थानक परिसरात चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button