तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात हूरुन्निसा उर्दू विद्यालय उमरखेडचे प्रथम क्रमांक

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
पंचायत समिति उमरखेड आणि स्टूडेंट वेल्फेअर इंग्लिश मिडीयम स्कूल दहागाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उमरखेड तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये हूरुन्न्निसा उर्दू माध्यमिक विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला. यानिमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीनजी भुतडा, प्रमुख पाहुणे श्री सखाराम मुळे उपविभागीय अधिकारी उमरखेड, श्री सतीश दर्शनवाड गट शिक्षणाधिकारी उमरखेड यांच्या उपस्थित सौ. सपना अग्रवाल यांच्या हस्ते विद्यार्थिनी कु. मंतशा कौसर मोहम्मद फसिउल्लाह हिला प्रमाणपत्र देउन गौरविण्यात आले. विज्ञान शिक्षक शेख फारूक यांचे विद्यार्थिनीला मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष अॅड्व्होकेट वसीम अहेमद यांनी विद्यार्थिनीचे कौतुक केले व सर्व शिक्षकवृंद मुख्याध्यापक शेख सलीम. स. शिक्षक शेख इरफान, बिलकीस बानो, अथर परवेज, शिक्षकेतर कर्मचारी शेख मतीन, सय्यद सरोश, शेख अफरोज यांना शुभेच्छा दिल्या.