गरीब निराश्रीतांना ब्लॅंकेट चे वाटप

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
( स्व दत्ता जयराम ससाने बहुउद्देशीय संस्थेचा स्तुत्य उपक्रम )
उमरखेड तालुका प्रतिनिधी
उमरखेड :- सध्या हिवाळा ऋतू सुरू असल्याने थंडीचा गारवा सर्वत्र जाणवु लागला आहे .अशा थंडीत निराश्रीत गरिबांना थंडीपासून बचाव होण्यासाठी स्व दत्ता जयराम ससाने बहुउद्देशीय संस्था उमरखेड च्या
वतीने मंदिरा बाहेर तसेच बस स्टेशन येथे आश्रय घेऊन राहणाऱ्या गरीब निराश्रीतांना स्व दत्तात्रय ससाने यांच्या सुविद्य पत्नी जनाबाई दत्तात्रय ससाने यांच्या हस्ते उबदार ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले .

तालुक्यात सध्या थंडीचा कहर असून सायंकाळनंतर तापमानात मोठी गिरावट येत असून त्यामुळे रात्रीला शहरात शुकशुकाट वाटत आहे .अशा थंडीत निराश्रीत गरीब मात्र आपल्या तुटक्या फाटक्या कपड्याने आपले अंग झाकून थंडीपासून बचाव करताना दिसत आहेत ही बाब संस्थेचे अध्यक्ष संजय ससाने यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आज सकाळी गावातील हनुमान मंदिर तसेच बस स्टेशन व व्यापारी संकुलाच्या शेडखाली आश्रय घेऊन असलेल्या गरीब लोकांना जनाबाई ससाने यांच्या हस्ते ब्लॅंकेट चे वाटप केले यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय ससाने सह संस्थेचे सदस्य व नागरिक उपस्थित होते .
स्व दत्ता जयराम ससाने बहुउद्देशीय संस्थेद्वारे राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे .