सामाजिक

मनोज जरांगे पाटील समर्थक उमेदवारांच्या मुलाखती संदर्भात बैठक

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड : आरक्षीत असलेल्या उमरखेड- महागांव विधानसभा मतदारसंघातुन इच्छूक अपक्ष उमेदवारांची व मराठा समन्वयक, उपोषणकर्ते व समाज बांधवांच्या उपस्थीत स्थानिक मनोज जरांगे पाटील संपर्क कार्यालय कॉम्प्लेक्समध्ये बैठक पार पडली.

या सभेत इच्छूक उमेदवार पुजा अंबादास धुळे, प्रेम हनवते, कृष्णा काळे, मनोज कांबळे, डॉ. कवडे, दत्ता गंगासागर, भाविक भगत, विजय खडसे यांच्या मुलाखती होऊन मराठा, मुस्लीम, बौद्ध समिकरणे जुळवून येणारी विधानसभा एक आंदोलन म्हणून लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी मनोज जरांगे जे उमेदवार देतील त्या उमेदवाराला इतर सर्व उमेदवारांनी जाहीर पाठिंबा दिला असून त्या दिलेल्या उमेदवाराच्या मागे सर्वच उमेदवारांनी उभे राहून विड्रॉल करण्याचा निर्णय घेऊन तसे त्यांनी लेखी प्रमाणपत्र मराठा समन्वय समितीने घेण्यात आले.

या बैठकीत स्वप्नील कनवाळे, सरोज देशमुख, विश्वभर वानखेडे, गजानन चव्हाण, नरेद्र सुर्यवंशी, शिवाजी देवसरकर, रवि शिंदे, अविनाश आसोले यांनी परखड भूमिका मांडली. यावेळी जो कोणी उमेदवार विड्रॉल घेणार नाहीत त्यासोबत सकल मराठा समाजाचा कोणताही संबंध राहणार नाही असे एकमताने ठराव घेण्यात आला. व ठरावावर उमेदवारांनी सह्या केल्या. या सभेला मराठा, मुस्लिम, मातंग, बौद्ध समाजाचे असंख्य कार्यकर्ते हजर होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!