Uncategorized
मनसेच्या इंजिनमध्ये पक्षप्रवेशाच्या स्वरूपातून अफाट गर्दी

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
दिनांक १ नोव्हेंबर २०२४ ०८२ उमरखेड विधानसभेमध्ये भाजपा कडून निष्ठावान दोन माजी आमदार राजेंद्र नजरधने तसेच नामदेव ससाने जे की संघाचे मुशीत तयार झालेले असून त्याचप्रमाणे कार्यकर्ता भाविक भगत असे निष्ठावान कार्यकर्ते असताना सुद्धा दोन वर्षांपूर्वी काँग्रेस मधून आयात करण्यात आलेले किसन वानखेडे यांना भाजप नेतृत्व देऊन काय सिद्ध करू पाहत आहे? हा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे.
स्थानिक संजोग भवन येथे भाजपा चे सच्चे कार्यकर्ते माजी आमदार राजेंद्र नजरधने यांना पक्षाने उमेदवारी नाकारली त्यामुळे त्यांनी तात्काळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यांनी दाखल केलेल्या उमेदवारीमुळे त्यांचा चाहता असणाऱ्या वर्गाने प्रचंड संख्येने आज मनसेमध्ये प्रवेश करून आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये माजी आमदार राजेंद्र नजरधने यांचे शक्तिस्थान असल्याचे दाखवून दिले. मनसेच्या इंजिन मुळे प्रतिस्पर्धी असणाऱ्या दोन्ही पक्षांना हादरा बसणार अशी चर्चा ऐकावयास मिळत आहे, कारण यापूर्वी भाजपामध्ये कार्यकर्त्यांच्या कार्य कुशलतेवर उमेदवारी चा विचार केला जायचा पण आता भाजपा ही व्यक्ती केंद्रित झाली काय? असा सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे.