आरोग्य

उपजिल्हा रुग्णालय उमरखेड उदघाटनाच्या प्रतिक्षेत( आमदार ससाने कधी मुहूर्त मिळणार हो )

शेख मुजाहिद

ससंपादक मो.7798306192

उमरखेड तालुक्याला आरोग्य सेवा व शासकीय आरोग्य सोयीसुविधा तात्काळ मिळाव्या या साठी शासनाने उमरखेड येथे उपजिल्हा रुग्णालय इमारत बांधकाम होवून मागील दोन तीन वर्षे झाले तरी या इमारतीचा शुभारंभ झाला नाही. उमरखेड चे आमदार ससाणे यांनी अद्यापही शुभारंभ करण्याचा मुहूर्त ठरविला नाही तसे पाहता भाजपची
सत्ता असताना तत्कालीन आमदार राजेंद्र नजरधने यांनी इमारत मंजुर करून आणली ३० खाटा वरून १०० खाटाचे विस्तारीकरण व बांधकाम भव्य इमारत रुग्णांना सोयी सवलती तात्काळ मिळाव्या या साठी तत्कालीन आमदार नजरधने यांनी इमारत मंजुर करून बांधकाम त्यांच्या काळात झाले. ससाने आमदार झाले तेव्हा पासुन रुग्णालय इमारत शुभारंभ करण्यात आला नाही. आमदार ससाने यांनी उपजिल्हा रुग्णालय सुरु करण्यासाठी मुहूर्तमेढ ठरत नाही. रुग्णालय बांधकाम करण्यासाठी कोट्या वधीचा निधी दिला इमारत बांधकाम होवून ही दोन तीन वर्षे झाले तरी मुर्त नाही मिळाला.

चौकट

तिवडी टाकळी व विविध खेडे विभागात रस्त्याचे बेहाल झाले आहेत वारंवार उपोषण करून सुद्धा पाच वर्षात रस्त्याचे काम अपूर्णच आहे पाच वर्षात रस्त्याचे काम पण पूर्ण झाले नाही आणि तालुक्यातील जनता आरोग्याची सुविधा व्हावी या आशेवर आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button