Uncategorized

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विकास कामाच्या भुमिपुजनाचा दिखावा तर नाही न


शेख मुजाहिद

ससंपादक मो.7798306192

उमरखेड शहरासह तालुक्यातील रस्त्यांची अक्षरशः अस्थिपंजर अशी अवस्था आहे तसेच मराठवाडा विदर्भ यातील दुवा असणाऱ्या पुलाने आपली आयुष्य मर्यादा केव्हाच ओलांडलेली आहे .उमरखेड पुसद रोड ढानकी रोड सह शहरातील रस्ते अतिशय दुर्धर अवस्थेत असून शहरातील प्रत्येक वार्डात मुसळधार पावसाने घाणीचे साम्राज्य तयार केलेले आहे याचा आरोग्यावर परिणाम होताना दिसून येत असून आरोग्य यंत्रणा सुद्धा कुचकामी ठरत आहे आणि तोंडावर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधी लागेल याचा नेम नसल्यामुळे सत्ताधारी पक्षाने विकास कामांच्या भूमिपूजनाचा गाजर जनतेच्या हाती देण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे का ?
पाच वर्षांमध्ये न झालेले काम ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच पुर्ण करणे कसे शक्य होईल की आपापले कमिशन हडपण्यासाठी हा अट्टाहास तर नाही ना? हा प्रश्न जनतेला पडलेला आहे कारण उमरखेड शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गो सी गावंडे महाविद्यालय पर्यंत व त्या पुढेही अत्यंत वर्दळीचा रस्ता असून या रस्त्याने अनेकदा कित्येक शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी इतर प्रवासी वाहनांवरून पडून अपघात झाल्याचे वृत्त बऱ्याच वृत्तपत्रांमधून प्रकाशित झाले होते त्यावेळी मात्र सत्ताधाऱ्यांना या कामास गती का देता आली नाही?
म्हणजे एकूणच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विकास कामाच्या भूमिपूजनाचे गाजर जनतेच्या हाती देत असल्याचे चर्चा नागरिकांतून ऐकावयास मिळत आहे. एकूणच विधानसभा मतदार संघाची असणारी खिळखिळी अवस्था विरोधक सुद्धा कोणताही विरोध न करता गुप गुमान बघत असल्याचे चित्र आहे. बऱ्याच कालावधीपासून उमरखेड शहरात उपजिल्हा रुग्णालयाची सुसज्ज इमारत तयार झालेली असून ती पूर्णपणे जनतेच्या सेवेत रुजू करण्याची कोणतीही दखल घेण्यात आलेली नसून आज मीतीस शहरासह संपूर्ण तालुक्यात टायफाईड, डेंग्यू या आजाराने आपले डोके वर काढलेले असताना या सुसज्ज असणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीकडे बघून उपचार थोडीच होणार आहेत त्याकरिता ती इमारत संपूर्ण तज्ञ अधिकारी कर्मचारी विविध मशीन वैद्यकीय साधने यांनी परिपूर्ण असणे गरजेचे आहे परंतु गोरगरीब जनतेचा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न सुद्धा मार्गी लागत नाही ही शोकांतिका आहे. त्याचप्रमाणे शहरासह तालुक्यामध्ये दारू गांजा मटका यांच्या आहारी तरुण मुले जात असून गुन्हेगारी प्रवृत्तीला पोषक होत असलेले वातावरणावर कोणत्याही बाजूने अंकुश ठेवण्याची चाहूल दिसत नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!