शहर

रेती तस्कराच्या वरदहस्ताने महसूल विभागावर अंकुशच राहिला नाही

रेती तस्करीचे खरे मास्टर माईंड स्थानिक महसुलातीलच

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192

तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदी पत्राला आपल्या स्वतःच्या मालकीची मालमत्ता समजून रेती तस्कर बिन बोभाट व खुलेआम पणे – मागील कित्येक दिवसापासून रेती तस्करी करीत असून या रेती तस्करी ला महसुलातीलच कर्मचाऱ्यांचे पाठबळ मिळत असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांकडून मिळालेल्या माहिती वरून पुढे येत आहे तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदी पात्रातील विविध गावात ट्रॅक्टर – व टिप्पर द्वारे अवैध रित्या रेतीची वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जात असून ठीक ठिकाणी नदीपात्रात कृत्रिमरीत्या बनविलेल्या बोटीद्वारे पैनगंगेतील खोल पाण्यातून रेतीचा उपसा केल्या जात असून नदीपात्रात पाणी नसलेल्या ठिकाणी
गाढवावरून रेतीची वाहतूक करून ती मुख्य रस्त्यावर काढल्या जात आहे व तिथून थेट शहरातील ठिकठिकाणी बांधकामावर अगदी सोन्याच्या भावात रेतीची विक्री केल्या जात आहे शहरातील ठिकठिकाणी बांधकामावर व शासकीय कामावर मोठ्या प्रमाणात रेतीचे ढिगारे दिसत असली तरीही महसूल प्रशासनातील कर्मचाऱ्यांना हे ढिगारे का बरे दिसत नसावेत असा प्रश्न जनसामान्यातून उपस्थित केल्या जात असून पैनगंगा नदी पात्रातून रेतीचा उपसा करण्यासाठी महसुलातील तलाठी मंडळ अधिकारी यांना हाताशी धरून रेती तस्कर मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी करून शासनाच्या
महसुलाला चुना लावीत असल्याचा प्रकार या प्रकारावरून पुढे येत आहे एरवी सर्वसामान्यांकडून पैनगंगा नदी पात्रातून एखाद्या बैलबंडीमार्फत रेतीची वाहतूक केल्यास हेच तलाठी व मंडळ अधिकारी कार्यवाहीची भीती दाखवत सर्वसामान्यांना कायद्याचा धाक दाखवतात मग बिन बोभाट पणे डंपर व ट्रॅक्टर द्वारे रेती तस्करी होत असताना याच महसूल कर्मचाऱ्यांना ही रेती तस्करी व वाहतूक का दिसत नाही असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात असून पैनगंगा नदी पात्राच्या आसपासच्या परिसरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात रेतीची साठवणूक केल्या जात
असून मोठमोठी ढिगारे रेती तस्करांनी गावोगाव निर्माण करून महसूल प्रशासनाला जणू आव्हानच दिल्याचे दिसत असून महसूल प्रशासन देखील रेती तस्करीला पाठबळ देत तेरी भी चूप अन मेरी भी चुप याप्रमाणे वागत असल्याचा आरोप सर्वसामान्यातून केल्या जात असून महसुलातील वरिष्ठ अधिका ट्याकडून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या रेती तस्करी ला वेळीच लगाम घातल्या गेला नाही तर महसुली कायद्याचा धाक संपुष्टात येऊन रेती तस्करी ला अजूनही रान मोकळे झाल्याशिवाय राहणार नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया सर्वसामान्यातून ऐकावयास मिळत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!