Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
शहर

ऑनलाइन फसवणुकीतील ₹१,०८,१०१ रुपये नागरिकांना परत; उमरखेड पोलिसांचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव!


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

उमरखेड पोलिसांची सायबर फसवणुकीविरुद्ध उल्लेखनीय कामगिरी!



चार नागरिकांना मिळाला दिलासा; पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्यासह अधिकारी व अंमलदारांच्या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक

सहसंपादक शेख मुजाहिद

सध्या देशासह महाराष्ट्रात ऑनलाइन फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, उमरखेड पोलिसांनी तत्परतेने कार्यवाही करत चार नागरिकांना ऑनलाइन फसवणुकीत गमावलेले एकूण १ लाख ८ हजार १०१ रुपये परत मिळवून देण्यात उल्लेखनीय यश मिळवले आहे. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल संबंधित नागरिकांनी पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्यासह पोलीस अधिकारी व अंमलदारांचा सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. पोलिसांच्या या कार्याचे नागरिकांकडून कौतुक होत असून, सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये पोलिसांनी दाखवलेली तत्परता नागरिकांसाठी दिलासादायक ठरली आणि
पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात आणि पोलीस निरीक्षक यशोधरा मुनेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या देखरेखीखाली उमरखेड पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कामगिरी केली.
चार नागरिकांची फसवणुकीतील रक्कम परत
१) संतोष माधवराव कदन, रा. असोली : यांची ऑनलाइन माध्यमातून ५६ हजार रुपयांची फसवणूक झाली होती. याप्रकरणी NCCR पोर्टलवर तक्रार नोंदवून ऑनलाइन चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांची संपूर्ण ५६ हजार रुपयांची रक्कम परत मिळवून देण्यात आली.
२) प्रकाश वाघुन सुरोशे, रा. मरसुळ : यांची २६ हजार १०१ रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाली होती. या प्रकरणात NCCR पोर्टलवर तक्रार नोंदवून चौकशी करण्यात आली आणि संपूर्ण रक्कम परत मिळवून देण्यात आली.
३) राहुल दीपकराव बानसकर, रा. उमरखेड : यांची १६ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाली होती. पोलिसांनी तक्रारीच्या अनुषंगाने ऑनलाइन चौकशी करून त्यांची संपूर्ण रक्कम परत मिळवून दिली.
४) मोहम्मद रफीक मोहम्मद अहमद, रा. साईनगर, उमरखेड : यांची १० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाली होती. या प्रकरणातही पोलिसांनी तक्रारीची दखल घेत ऑनलाइन चौकशी केली आणि त्यांची संपूर्ण रक्कम परत मिळवून दिली.
अशा प्रकारे चार नागरिकांना एकूण १ लाख ८ हजार १०१ रुपये परत मिळवून देण्यात उमरखेड पोलिसांना यश आले. या कामगिरीबद्दल नागरिकांनी पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गुंडे, पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, पोलीस हवालदार चंदन जाधव तसेच पोलीस अंमलदार विष्णू राठोड, संघशील टेंभरे आणि दिगंबर गिते यांना सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविले.
यावेळी नागरिकांनी पोलिसांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत भविष्यातही अशाच प्रकारे नागरिकांना सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
सायबर फसवणूक झाल्यास तातडीने १९३० वर संपर्क साधा!
यावेळी पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांनी नागरिकांना सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले. मोबाईलवर आलेला ओटीपी कोणालाही सांगू नये, अनोळखी APK फाइल डाउनलोड करू नये तसेच UPI स्कॅम, डिजिटल अरेस्ट, बनावट ग्राहक सेवा क्रमांक, ई-चलानच्या नावाखाली होणारी फसवणूक, खोटे शेतीविषयक ॲप्स, आगाऊ पेमेंटच्या नावाखाली होणारी फसवणूक आणि ऑनलाइन मार्केटप्लेसवरील आर्थिक गैरव्यवहारांपासून सावध राहावे, असे त्यांनी सांगितले.
ऑनलाइन फसवणूक झाल्यास वेळ न घालवता तातडीने १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवावी. तसेच जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.
उमरखेड पोलीस ठाणे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर असून, सायबर गुन्ह्यांना बळी पडू नये यासाठी प्रत्येकाने जागरूक राहणे आवश्यक असल्याचे पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांनी स्पष्ट केले.
सायबर गुन्हेगारांना आळा घालण्यासोबतच फसवणुकीत गेलेली रक्कम परत मिळवून देण्याच्या उमरखेड पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांमध्ये पोलिसांप्रती विश्वास अधिक दृढ झाला आहे.


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button