Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
Uncategorizedशहर

संभाजीदादा नरवाडेंच्या राजकीय अनुभवाची राम देवसरकरांना साथ; ईश्वरचिठ्ठीने जिल्हा बँकेत विजयाचा गुलाल!


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802


२५-२५ मतांची बरोबरी अन् ईश्वरचिठ्ठीने फिरवला निकाल; अंकुश देवसरकरांच्या एका मताने प्रकाश पाटलांचे गणित बिघडल्याची सहकार क्षेत्रात जोरदार चर्चा!
स्वर्गीय माजी आमदार अनंतराव देवसरकर यांच्या राजकीय वारशाला नवी दिशा; नवनिर्वाचित संचालक राम देवसरकर यांचा संभाजीदादा नरवाडे यांच्या हस्ते सत्कार


महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे


महागाव : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उमरखेड तालुका गटातील निवडणुकीने सहकार क्षेत्रात मोठी राजकीय चर्चा निर्माण केली आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत राम देवसरकर आणि प्रकाश पाटील देवसरकर यांना प्रत्येकी २५ मते मिळाल्याने अखेर ईश्वरचिठ्ठीद्वारे निकाल निश्चित करण्यात आला. यामध्ये राम देवसरकर यांच्या नशिबी विजयाचा कौल आला. या विजयामागे स्वर्गीय माजी आमदार अनंतराव देवसरकर यांचे कट्टर समर्थक, निकटवर्तीय मित्र तथा यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक आणि जिनिंग फॅक्टरीचे अध्यक्ष संभाजीदादा नरवाडे यांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याची चर्चा सहकार क्षेत्रात सुरू आहे.
संभाजीदादांच्या अनुभवाचा राम देवसरकरांना फायदा!
स्वर्गीय माजी आमदार अनंतराव देवसरकर आणि संभाजीदादा नरवाडे यांच्यात अनेक वर्षांपासून राजकीय मैत्री आणि विश्वासाचे संबंध होते. अनंतराव देवसरकर यांच्या राजकीय वाटचालीत संभाजीदादा नरवाडे यांनी खंबीर साथ दिली होती.
याच मैत्रीचा वारसा जपत संभाजीदादा नरवाडे यांनी अनंतराव देवसरकर यांचे पुत्र राम देवसरकर यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली. महागाव तालुक्यातील प्रतिनिधी निवडीच्या प्रक्रियेत काही अटी व शर्तींवर राम देवसरकर यांना पूर्ण पाठिंबा देत निवडणुकीची रणनीती आखण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगण्यात येते.
अंकुश देवसरकरांच्या एका मताने प्रकाश पाटलांचा घात?
उमरखेड तालुका गटातील निवडणुकीत राम देवसरकर आणि प्रकाश पाटील देवसरकर यांच्यात अत्यंत अटीतटीची लढत झाली. दोघांनाही प्रत्येकी २५ मते मिळाली. एक मत बाद झाले, तर डॉ. अंकुश देवसरकर यांना एक मत मिळाल्याचे सांगण्यात येते.
या एका मतामुळे निवडणुकीचे संपूर्ण गणित बदलल्याची चर्चा उमरखेड आणि महागाव तालुक्यात रंगली आहे. ‘अंकुश देवसरकर यांनी स्वतःचे एक मत मिळवून प्रकाश पाटील देवसरकर यांचे राजकीय गणित बिघडवले आणि राम देवसरकर यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला,’ अशी चर्चा सहकार क्षेत्रातील राजकीय वर्तुळात सुरू आहे.
मात्र, या मतविभाजनामागील नेमकी राजकीय भूमिका काय होती, याबाबत संबंधितांची अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
वडिलांच्या राजकीय वारशाला मुलाची विजयाची सलामी!
स्वर्गीय माजी आमदार अनंतराव देवसरकर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद भूषविले होते. सहकार क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे.
त्यांचे पुत्र राम देवसरकर यांनी आता याच जिल्हा बँकेत संचालकपद मिळविल्याने वडिलांच्या सहकार क्षेत्रातील राजकीय वारशाला पुढे नेण्याची संधी मिळाली आहे.
अनंतराव देवसरकर यांचे निकटवर्तीय मित्र संभाजीदादा नरवाडे यांच्यासाठीही हा विजय विशेष महत्त्वाचा ठरला आहे. आपल्या जुन्या मित्राच्या मुलाला जिल्हा बँकेच्या संचालकपदी विराजमान होताना पाहून त्यांना आनंद झाल्याचे सांगण्यात येते.


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button