प्रभाग ७ मध्ये भूजल पातळीचा आढावा; आगामी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बोरवेलमध्ये कॅमेरा टाकून केली पाणीपातळीची पाहणी

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
हिमायतनगर( तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम):
हिमायतनगर शहरातील प्रभाग क्रमांक ७ मध्ये आगामी काळात संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि उपलब्ध जलस्रोतांचे सुयोग्य नियोजन करण्यासाठी नगरसेविका प्रतिनिधी रमेश पंडित यांच्या नेतृत्वात एक महत्त्वपूर्ण पाहणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत परिसरातील बोरवेलमध्ये विशेष डिजिटल कॅमेरा टाकून भूजल पातळीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
सध्याच्या घडीला पाण्याची नेमकी पातळी किती आहे आणि चालू स्थितीत जिवंत झऱ्यांची संख्या किती आहे, याचा सविस्तर अंदाज या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घेण्यात आला. या पाहणीदरम्यान भोकर येथील तज्ज्ञ डिजिटल कॅमेरा हाताळणी तंत्रज्ञ उपस्थित होते, ज्यांनी अत्यंत अचूकतेने बोरवेलमधील अंतर्गत स्थितीची पाहणी करून आकडेवारी नोंदवली.
आगामी उन्हाळा किंवा संभाव्य टंचाईच्या काळात नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भासू नये, यासाठी वेळीच उपाययोजना हाती घेण्याच्या दृष्टीने ही पाहणी अत्यंत महत्त्वाची ठरणार असून, या अहवालाच्या आधारे पुढील जलव्यवस्थापनाचे नियोजन केले जाणार आहे.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



