Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
शहर

बेकायदेशीर वाहनधारकांवर पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांचा थेट बडगा, हिमायतनगर पोलिसांची मोठी कारवाई!

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

हिमायतनगर: (तालुका प्रतिनिधि शेख खय्यूम )
रस्त्यावर नियम धाब्यावर बसवून सर्वसामान्य प्रवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या अवैध वाहतूकदारांवर हिमायतनगर पोलिसांनी आज मोठी कारवाई केली. पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे स्वतः रस्त्यावर उतरले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली शहरात अवैध प्रवासी वाहतुकीचा बिमोड करण्यासाठी विशेष धडक मोहीम राबवण्यात आली. पोलिसांच्या या अचानक झालेल्या कारवाईमुळे बेकायदेशीर वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत.
एसटी बसगाड्यांना अडथळा ठरणाऱ्या, बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गर्दी करणाऱ्या आणि क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबून वाहतूक करणाऱ्या खाजगी गाड्यांवर तसेच ऑटो रिक्षांवर पोलिसांनी कारवाई केली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अनेक वाहनांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली.
“स्वतःच्या फायद्यासाठी प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांची गय केली जाणार नाही. आगामी काळात ही मोहीम अधिक तीव्र केली जाईल,” असा इशारा पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी दिला.
पोलिसांच्या या कारवाईमुळे बसस्थानक परिसर मोकळा झाला असून, नागरिकांमधून या कामगिरीचे स्वागत होत आहे.

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button