संत रोहिदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

.
शेख मुजाहिद
सहसंपादक मो,7798306192
उमरखेड
श्री संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज यांची 647 वी जयंती येथील स्थानिक बस स्थानकावर शनिवार दि 24 रोजी सर्व समाज बांधवांच्या समवेत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .

यावेळी सामाजिक कार्यकर्ते किसनराव वानखेडे यांनी संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले .यावेळी संत रोहिदास महाराज यांच्या विचारावर आधारित मते व्यक्त करण्यात आली
संत रोहिदासांचे विचार सर्वांना समजणे आवश्यक आहे याकरिता त्यांच्या विचारांचा उत्सव साजरा करत आहोत असे सामाजिक कार्यकर्ते किसनराव वानखेडे यांनी सांगितले .

यावेळी कैलास ईटकरे.मारुती ईटकरे.गजानन सुरोशे. पंजाब ईटकरे, विकास खंदारे, राजू गायकवाड, पदमिना ईटकरे, बालाजी गवळे, ओंकार सुरोशे, साईनाथ सुरोशे, प्रसाद सुरोशे, सुनील इटकरे ,गजानन वाघमारे, नंदु कळसे , भारत गवळे ,सुनील वानखेडे ,दुर्गा वाघमारे ,सिताराम वाघमारे, राजू गायकवाड सह मोठ्या संख्येने समाज बांधव बांधवांनी संत शिरोमणी रोहिदास महाराजांची जयंती उत्साहात साजरी केली .