मनोज जरांगे यांच्या उपोषणाला उमरखेड येथून पाठिंबा

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे. सगे सोयरे हा शब्द सामील करून येणाऱ्या अधिवेशनामध्ये कायदा पारित करावा यासाठी मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसणार आहेत. मराठा आरक्षणाचा लढा ६ महिन्यापासून तीव्र पद्धतीने चालू असून त्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणासाठी जी अधिसूचना काढली त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे दि १० फेब्रुवारीपासून अंतरवाली या ठिकाणी आमरण उपोषणाला बसत आहेत मनोज दादा जरांगे यांना पाठिंबा म्हणून आम्ही सर्वजण मराठा आरक्षणासाठी
दिनांक १२ फेब्रुवारीपासून तहसील कार्यालय उमरखेड येथे आमरण उपोषणाला बसणार आहोत. अशी माहिती निवेदनाद्वारे तहसीलदार उमरखेड यांना देण्यात आली. उपोषण करते १) सौ. सरोज नंदकिशोर देशमुख उमरखेड २) सचिन दत्तात्रय घाडगे उमरखेड ३) सुदर्शन दत्तराव जाधव जेवली. ४) शिवाजी विठ्ठल पवार गांजेगाव हे सर्वजण १० फेब्रुवारीपासून तहसील कार्यालय उमरखेड या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आहेत.