Uncategorized

कोपरा खुर्द येथे वाघाची दहशत : कालवड व गायीची शिकार

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192

वनपरिक्षेत्र उमरखेड अंतर्गत येत असलेल्या कोपरा खुर्द येथे दिनांक 31 जानेवारी व १ फेब्रुवारी रोजी वाघाने कालवड व दुसऱ्या दिवशी गाईची शिकार केली. या घटनेने परिसरातील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोपरा बुद्रुक येथील शेतकरी परमेश्वर भोयर यांच्या शेतातील गोठ्यात बांधून असलेल्या तीन वर्षाच्या कालवडीवर हल्ला करुन ठार केले. त्यानंतर सदर शेतकऱ्याने वनपरिक्षेत्र अधिकारी उमरखेड यांच्याकडे तक्रार अर्ज देऊन नुकसान भरपाईची मागणी केली. संबंधित शेतकऱ्याच्या तक्रार अर्जाची तात्काळ दखल घेऊन वनपरिक्षेत्र अधिकारी उमरखेड यांनी घटनास्थळाच्या परिसरात सीसीटीव्ही ट्रॅप कॅमेरे लावून वाघाचा शोध घेण्याचा
प्रयत्न केला. दुसऱ्याच दिवशी सदर वाघ परमेश्वर भोयर यांच्याच शेतातील गोठ्यावर परत येऊन गाईची शिकार करीत असताना ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाला. ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झालेला हा पट्टेदार वाघ असून हा वाघ अनेक शेतकऱ्यांच्या दृष्टीस पडल्याचे शेतकऱ्यातून सांगण्यात येत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्याने वनपरिक्षेत्र अधिकारी उमरखेड

यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.

वाघाच्या दहशतीने शेतकरी महिला मुले व गुराखी यांच्यात चांगलीच भीती निर्माण झाली. सध्या रब्बी हंगाम काढणीच्या कामाची लगबग सुरू असून अशाच वेळी वाघाने धुमाकूळ घातल्यामुळे
शेतीची कामे सोडून द्यावी की काय असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. वाघाचा तात्काळ बंदोवस्त करण्याच्या मागणीसाठी कोपरा खुर्द येथील शेतकरी भारत तुपेकर, शेषराव भोयर, छबुराव भोयर, दत्ता सावंत, शंकर भोयर, शंकर वाघमारे, परमेश्वर भोयर, तुकाराम निळकंठ, मिलिंद वाघमारे, प्रसाद भोयर, पांडुरंग नलावडे यांच्यासह नागरिक वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयावर धडकले होते.

पट्टेदार वाघ दूरवरून आल्याची शक्यता वनविभागाकडून कोपरा खुर्द शेत शिवारात

लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झालेला पट्टेदार वाघ हा दरवरून आलेलाच असावा असा अंदाज वनपरिक्षेत्र अधिकारी मनीष पांडे यांनी व्यक्त केला. सदर पट्टेदार वाघ हा एकाच ठिकाणी मुक्कामी राहत नाही. तो पुढील प्रवासात लवकरच निघण्याची शक्यता देखील व्यक्त केली. शेतकऱ्यांनी घाबरू नये असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी मनीष पांडे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!