शहर

उमरखेडमध्ये डीजे वाजविण्यावरून दगडफेक

पोलीस उपनिरीक्षकांसह कर्मचारी जखमी पोलिसांचा तगडा बंदोबस्त

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192

उमरखेड शहरातील धार्मिक स्थळाजवळून लग्नाची वरात जात असताना डीजे वाजविण्यावरून दोन गटां त वाद झाला. त्यानंतर एका गटाकडून दगडफेक करण्यात आली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षकांसह कर्मचारी जखमी झाले. ही घटना शनिवारी रात्री शहरात घडली. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

पोलीस उपनिरीक्षक अमोल राठोड व अन्य पोलीस कर्मचारी अशी जखमींची नावे आहेत. शनिवारी रात्री लग्नाची वरात शहरात काढण्यात आली होती. ही वरात धार्मिकस्थळापासून
जात होती. यावेळी याठिकाणी धार्मिक कार्यक्रम सुरू होता. दरम्यान, डीजे वाजविण्यावरून दोन गटांत वाद सुरू झाला. त्यानंतर एका समुदायाने डीजेवर दगडफेक केली. घटनेची माहिती मिळताच उमरखेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी वादावर नियंत्रण मिळविण्यासाठी आलेल्या पोलिसांवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत पोलीस उपनिरीक्षक अमोल राठोड व अन्य कर्मचारी जखमी झाले. याप्रकरणी उमरखेड पोलिसांनी दोन्ही गटांतील अज्ञात

आरोपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले. या घटनेमुळे शहरात दहशतीचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे. पोलीस प्रशासनाकडून शहरात तगडा बंदोबस्त लावण्यात आला. पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी रविवारी उमरखेडला भेट दिली. एसडीपीओ प्रदीप पाडवी, ठाणेदार शंकर पांचाळ परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. वृत्त लिहिस्तोवर याप्रकरणी कुणालाही अटक करण्यात आलेली नव्हती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!