विकास निधीतील कामांची गुणवत्ता हरवली

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात विविध विकास कामांसाठी शासन स्तरावरून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला असून या विकास निधीतून संबंध तालुक्यात मोठ्या प्रमाणात विविध विभागांतर्गत विकास कामे चालू असल्याचे दिसत आहे परंतु या विकास कामांची गुणवत्ता भ्रष्टाचाराच्या बजबज पुरीत हरवल्याचे धक्कादायक वास्तव पुढे येत आहे राज्य शासनाकडून शिक्षण आरोग्य रस्ते पाणीपुरवठा यासह विविध कामा साठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे परंतु उपलब्ध निधीतून दर्जाहीन व बेसुमार पद्धतीने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून कंत्राटदार मनमर्जी प्रमाणे निकृष्ट कामे करीत असल्याची ओरड सामान्य नागरिकांतून होत आहे सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद बांधकाम विभाग जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग आरोग्य विभाग शिक्षण विभाग नगरपंचायत व नगरपालिका यासह विविध विभागा शासनाच्या मुख्य उद्देशाला अधिकारी व कंत्राटदाराकडून हरताळ
मार्फत ही कामे केल्या जात आहेत
परंतु ज्या मुख्य उद्देशाने शासनाने विकास कामांसाठी नियम व निकष आखून दिले आहेत ते नियम निकष बासनात गुंडाळून मनमर्जीप्रमाणे वाटेल त्या पद्धतीने थातूरमातूर कामे उमरखेड शहरासह ग्रामीण भागात सुरू असल्याचे दिसत आहे शासन स्तरावरून उपलब्ध झालेल्या निधीला कमिशन खोरीचे ग्रहण लागल्याची ओरड सर्वत्र होत असून आपापल्या वाट्याचे कमिशन घेऊन अधिकारी व राजकीय नेते अशा पद्धतीने थातूरमातूर व निकृष्ट कामे करणाऱ्यांना अभय देत असल्याचे बोलल्या जात असून अशा प्रकारच्या थातूरमातूर व निकृष्ट विकास कामामुळे शासन स्तरावरून उपलब्ध झालेल्या विकास निधीतून विशिष्ट लोकांचा विकास होत असल्याचे खोचक व खडे बोल जनसामान्यातून सुनावले जात असल्याचे दिसत असून थातूरमातूर व निकृष्ट कामे करून शासन निधी हडप करू पाहणाऱ्या संबंधितावर कार्यवाही करण्याची मागणी पुढे येत आहें