Uncategorized

हरधडा येथे जुगार अड्ड्यावर धाड रोख रक्कमेसह चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192

उमरखेड उमरखेड ते ढाणकी मार्गावरील ब्राह्मणगाव रोड हरधडा फाटा येथील शेत शिवारात गोपेवाढ यांच्या शेतात जुगार भरत असल्याची गोपनीय माहिती यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्याने तेथील जुगार अड्ड्यावर धाड मारून सात मोटरसायकल वाहनासह सात जुगार खेळणाऱ्यांना दि 29 डिसेंबर दुपारी 4 वाजताच्या सुमारास ताब्यात घेऊन त्यांच्या जवळील नगदी रक्कम 34,840 /- रुपये व
3,95,840/- रुपयाचा सात मोटार सायकल सह मुद्देमाल जप्त केला. अटक करण्यात आलेल्यां
विरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा 12 (अ) नुसार कारवाई करण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय

गजानन गजभारे, पीएसआय अमोल सांगळे, जमादार रमेश राठोड व कर्मचाऱ्यांनी पार पाडले. जुगार खेळताना अटक करण्यात आलेल्या आरोपी मध्ये बापूराव गोपेवाड रा. ढाणकी, शेख लतीफ शेख हुसेन रा कृष्णापूर, लक्ष्मण कळमकर रा ढाणकी, नितीन कुसुंबाड रा ढाणकी, कयूम खान रियाज खान पठाण रा ढाणकी, विलास याटेवाड रा ढाणकी यांना अटक करून जातमुसक्यावर सोडण्यात आले. पुढील तपास एपीआय भरत चापाईतकर, पोलीस जमादार रोशन सरनाईक करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!