Uncategorizedशहर

निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशीया यांनी घेतला नोडल अधिका-यांकडून आढावा

शेख मुजाहिद

सहसंपादक मो.7798306192

उमरखेड:- दि27( उमाका ): जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी यवतमाळ डॉ. पंकज आशीया यांनी आज नोडल अधिकारी व पोलिस अधिकारी यांची आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय येथे आढावा बैठक घेत निवडणूकविषयक कामकाजाचा आढावा घेतला.
यावेळी उपस्थित पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सखाराम मुऴे, तहसीलदार आर. यु. सुरडकर, तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंतराव गायकवाड , गटविकास अधिकारी प्रवीण कुमार वानखडे, नायब तहसीलदार वैभव पवार, नायब तहसीलदार एस. डी. पाईकराव, उमरखेड पोलीस निरीक्षक आदी यावेळी उपस्थित होते.


2024 लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लोकसभा मतदार संघातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत शांततेत व पारदर्शकपणे पार पाडावी यासाठी नेमण्यात आलेल्या अधिकारी कर्मचारी वर्गाने कर्तव्यात कसूर न ठेवता दक्ष रहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.

15 हिंगोली लोकसभा मतदार संघात उमरखेड विधानसभा मतदार संघ समाविष्ट आहे. उमरखेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय येथे अधिकारी कर्मचारी यांनी कामकाजासंदर्भात आढावा बैठक घेतली.
उमरखेड विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र तेथील उपलब्ध सुविधा व सुरक्षा या विषयीचा आढावा घेतला.
निवडणुकीचे काम हे अत्यंत जबाबदारीचे असते. अधिकारी कर्मचारी वर ज्या कामाची जबाबदारी सोपविलेली आहे त्या कामाची त्यांनी पुरेपुर माहिती करुन घ्यावी, म्हणजे दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यास अडचण येणार नाही. मतदान केंद्राच्या ठिकाणी वीज पाणी व इतर आवश्यक

सुविधा संबंधित यंत्रणेने तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना ही त्यांनी बैठकीत दिल्या व या निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या आचार संहितेच्या काळात कोणी ही आचार संहितेचे उल्लंघन करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी केले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!