निवडणूक आचार संहितासंदर्भात तक्रार करण्यासाठी सी-व्हिजिल ॲपची सुविधासहा. नि. अधिकारी आर. यू .सूरडकर

शेख मुजाहिद
संसपादक मो.7798306192
उमरखेड (उमाका)दि. 27 : लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास त्याबाबतची तक्रार करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने नागरिकांसाठी सी-व्हिजिल ॲपची सुविधा उपलब्ध करून दिली असल्याची माहिती सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार आर. यू. सुरडकर यांनी आज येथे दिली.
आज सकाळी सहा. निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार आर. यू . सुरडकर यांनी तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीला उपस्थित सर्वाना प्रशिक्षण दिले. लोकसभा निवडणुकीत आचार संहितेचे पालन व्हावे याकरिता आयोगाकडून प्रयत्न केले जात आहेत. याबाबत आचारसंहिता भंग होत असल्यास नागरिकांना तक्रार करणे सुलभ होण्यासाठी सी-व्हिजिल ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे. काही अनुचित प्रकार आढळून आल्यास नागरिकांना फोटो, व्हिडिओ बनवून ॲपवर तक्रार करता येईल. या तक्रारीची १०० मिनिटांच्या आत दखल घेऊन कारवाई केली जाणार आहे. तसेच तक्रारकर त्याचे नाव गोपनीय राहील असे सांगण्यात आले .
तक्रारीसाठी सी-व्हिजिल ॲप:- नागरिक तपास अधिकारी निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यासाठी वेगवेगळे ॲप आहे सी व्हिजिल सिटीजन ॲप प्ले स्टोअर मधून डाउनलोड करून तक्रार करता येईल
कोणत्या तक्रारी करता येणार?:- या ॲपवर मद्य, पैसे वाटप, अनधिकृत बॅनर, प्रक्षोभक भाषण इतर आचारसंहिता भंग करणाऱ्या तक्रारी करता येईल
ॲपवरील तक्रारीची तातडीने दाखल:-निवडणुकीत आचारसंहिते संदर्भात तक्रार करण्यासाठी सी-व्हिजिल ॲपची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे . ॲपवरील तक्रारीची तातडीने दखल घेऊन संबंधितामार्फत कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.