सकल मराठा समाज व मनोज जरांगे पाटील पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून हिंगोली लोकसभा निवडणुक सरोजताई देशमुख लढवण्याची शक्यता.

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
सामाजिक कार्यकर्त्या सौ. सरोजताई नंदकुमार देशमुख या हिंगोली लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या त्या खासदारकीच्या प्रमुख दावेदार आहेत अशी चर्चा हिंगोली मतदार संघात सुरु आहे. जवळ पास दोन दशकां पासून सरोजताई या मतदार संघात सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करत आहेत. सामान्य नागरिकांच्या व विशेषकरून महिलांच्या अडीअडचणीत धावून जाण्याच्या त्यांचा स्वभाव आहे. लोकांच्या अडचणी सोडवताना वेळ प्रसंगी त्यांचावर गुन्हे सुद्धा नोंदविण्यात आले असून त्यांना तुरूंगवास भोगावा लागले आहे मात्र तरी देखील त्यांनी शासन दरबारी गरजवंतांचा आवाज बुलंद करण्याचा त्यांचा निर्धार सोडलेला दिसत नाही. आता पर्यंत राजकारणा पासून दूर राहणाऱ्या उच्चशिक्षित सरोजताईंनी आता संसदेत जावं व मराठा आरक्षण,शेती,आरोग्य वाढत चाललेली बेरोजगारी या विषयावर आवाज उठवावा ही सर्वसामान्य जनतेची भूमिका आहॆ. गोरगरीबांच्या मुलांचं शिक्षण व्हावं या साठी शिक्षण संस्था सुरु करून त्याच्या शिक्षनाची सोय करणाऱ्या, पाणी फॉउंडेशनच्या माध्यमातून दुष्काळी पट्टा पाणीदार करण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या, अवैध दारूबंदी करून हजारो महिलांचे आयुष्य उद्धवस्त होण्या पासून वाचवणऱ्या,महिला सक्षमीकरना साठी अनेक उपक्रम राबवणाऱ्या,कोरोना काळात जीवाची पर्वा न करता लोकांसाठी जीवाचं रान करणाऱ्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रशासनाशी भांडणार्या वेळ पडली तर गुन्हे घेणाऱ्या, प्रबोधनाचे अनेक उपक्रम घेणाऱ्या, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर जरांगे पाटलांचा आदर्श डोळ्या समोर ठेऊन समजासाठी लढणाऱ्या अश्या सरोजताई यांनी आता निवडणुक लढवावी ही भावना सामान्य जनतेच्या मनात आहे. सोबतच्या लोकांना जीवापार जपणाऱ्या परिसरा मध्ये रणरागिणी म्हणून परिचिय असलेल्या सरोजताईच्या मागे हिंगोली लोकसभा मतदार संघातील जनता उभी राहील अशी चर्चा सर्व जागी पाहायला मिळत आहे.