Uncategorized

पो.स्टे. पुसद शहर परीसरात अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगुण असलेल्या एकास ताब्यात घेवुन केले अग्नीशस्त्र जप्त

स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ ची कारवाई.

शेख मुजाहिद

सहसंपादक मो.7798306192

आगामी लोकसभा निवडणुक संबंधाने पाहिजे व फरार असलेले आरोपी व वारंट मधील आरोपी शोध, अवैध धंदे विरुध्द कारवाई, संशयोत व सक्रीय गुन्हेगारांची माहिती काढूण अ उघड गुन्हे उघडकीस आणने बाबत मा. पोलीस अधीक्षक सो. यवतमाळ यांचे आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक पुसद परिसरात कैम्प करुन असतांना आज दिनांक २८/०३/२०२४ रोजो स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाला पहाटे सुमारास गोपणीय बातमीदाराकडुन खात्रीलायक बातमी मिळाली की, इसम नाम सचिन अशोक राउत रा. भिमनगर, काकडदाती पुसद व शुभम रमेश राउत यांच्या जवळ गावठी बनावटीची पिस्टल (कट्टा) असुन ते त्यांचे घरी थांबलेले आहेत व दखलपात्र गुन्हा करण्याचे बेतात आहेत. अशा विश्वसनीय माहिती वरुन पथकाने तात्काळ काकडदातो पुसद येथे पोहचुन प्राप्त माहितीची खातरजमा करणे करीता सचिन अशोक राउत यांचे घरी पंचासह घरझडती कामी गेले असतांना नमुद इसमास ताब्यात घेवुन गावठी पिस्टल बाबत विचारपुस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देवुन बंदुक चुलत भाऊ शुभम याचेकडे असल्याचे सांगुन पळुन जान्याचा प्रयत्न केला तेंव्हा पो. स्टाफ चे मदतीने त्यास अटकाव करुन लागलीच शुभम रमेश राउत यास ताब्यात घेवुन नमुद दोघांनाही गावठी पिस्टल बाबत विचारपुस केली असता सचिन राउत याने सांगीतले की काही दिवसांपुर्वी त्यांनी गावठी पिस्टलने फायरिंगचो प्रक्टीस केली होती व ती पिस्टल घराचे पाठीमागील स्वयंपाक खोलीचे शेड मध्ये ठेवली असल्याचे सांगीतल्याने सदर ठिकाणाची पाहाणी केली असता स्वयंपाक खोलीचे शेड मधील एका पिशवी मधुन एक गावठी बनावटीची पिस्टी (देशी कट्टा) किमंत ३०,००० रु व ०२ नग पितळी काडतूस किमंत १०००/- रु असा एकुण ३१,००० रु चा मुद्देमाल मिळून आल्याने पंचासमक्ष जप्त करुन आरोपी १) सचिन अशोक राउत वय २५ वर्षे, २) शुभम रमेश राउत वय २६ वर्ष. दोन्ही रा. भिमनगर बुध्दविहार जवळ काकडदाती पुसद यांचे विरुध्द पोलीस स्टेशन पुसद शहर येथे भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक, यवतमाळ डॉ. श्री. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक श्री. पियुश जगताप, श्री. आधारसिंग सोनोने पो. नि. स्थागुशा यांचे मार्गदर्शनात सपोनि गजानन गजभारे, पोउपनि शरद लोहकरे, चापोउपनि रेवन जागृत, पोलीस अंमलदार सुभाष जाधव, तेजाब रणखांब, कुणाल मुंडोकार, रमेश राठोड, मोहंमद ताज, सर्व स्थागुशा यवतमाळ, व मपोशी इंदु पवार पो.स्टे. पुसद शहर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!