शैक्षणिक

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपदी संतोष काटे यांची निवड तर उपाध्यक्षपदी शेख इस्माईल,

शेख मुजाहिद

सहसंपादक मो.7798306192

उमरखेड पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या व दर्जेदार शिक्षणासाठी तालुका भर नावलौकिक मिळविलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चालगणी येथील शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड करण्यात आली असून या निवडीत चालगणी गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गजानन काटे तर उपाध्यक्ष म्हणून शेख इस्माईल यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर सदस्य म्हणून अमोल थोटे देवराव कदम सायली विनकरे सुरेखा साळेकर ज्योत्स्ना ताई थोटे प्रियंका शिंदे यांची निवड करण्यात आली सर्वप्रथम येथील शाळेचे मुख्याध्यापक सुरेश गोरे यांनी या निवड कार्यक्रमा अगोदर निवडीचे नियम व निकष उपस्थितांना समजावून सांगितले त्यानंतर अध्यक्षपदी संतोष काटे व उपाध्यक्षपदी शेख इस्माईल यांची एकमेव नावे उपस्थित कडून पुढे करण्यात आली त्यामुळे बिनविरोध त्यांची निवड झाली या निवड कार्यक्रमाचे वेळी रामेश्वर पाटील कदम दिगंबर थोटे तंटामुक्ती अध्यक्ष माजी सरपंच त्रिंबक पाटील थोटे सुरेश पाटील कदम संदीप कदम अविनाश थोटे परमेश्वर जाधव किसन कदम नारायण विनकरे संदीप विनकरे नारायण थोटे विजय थोटे त्रिंबक नरवाडे येथील शाळेचे सर्व शिक्षक व बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनियुक्त अध्यक्ष व उपाध्यक्षांचे उपस्थित गावकऱ्यांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!