शैक्षणिक

शेतकऱ्यांना माती परीक्षण मार्गदर्शन

शेख मुजाहिद

सहसंपादक मो.7798306192

उमरखेड: उमरखेड कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थीनिंनी उमरखेड तालुक्यातील उमरखेड शेती शिवारात माती परीक्षणाचा विशेष प्रकल्प राबविला. यावेळी कृषीकन्या साक्षी कु. ऋतुजा चव्हाण, साक्षी डुकरे, रश्मी सोरते, ऋतुजा गवळी, आयेशा खानम, भाविका मसराम ,यांनी अनुक्रमे उत्तमराव शिंदे, विजयराव शिंदे यांच्या शेतात जाऊन माती परीक्षणाचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
जमिनीची सुपीकता जपण्यासाठी सातत्याने माती परीक्षण केले पाहिजे असे मार्गदर्शन करण्यात आले. माती परीक्षणातून नत्र, स्फुरद ,पालाश , सुक्ष्मअन्नद्रव्य जमिनीचा सामू विद्राव्य क्षारांचे प्रमाण आधीची माहिती परीक्षणातून मिळाल्याने पीक लावगड सोपी होते व उत्पन्नात वाढ होते अशी माहिती यावेळी देण्यात आली.
माती परीक्षण करताना जमिनीचा उंच-सखलपणा लक्षात घेऊन वेगवेगळे भाग पाडून 5 ते 18 नमुने घ्यावेत. त्यासाठी 25 सेमी खड्डा करावा व कापडी पिशवीत माती प्रयोगशाळेत पाठवावी असे आवाहन करण्यात आले.सदर उपक्रम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य मा.श्री . एस.के. चिंतले सर , ग्रामीण जागृकता कार्यानुभव कार्यक्रमाचे प्रमुख श्री. व्हाय. एस. वाकोडे सर व मृदा विषयतज्ञ प्राध्यापिका वानखेडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!