Uncategorized

मौजा बाळदी येथे शिक्षकांची त्वरित नियुक्ती करा

(‘प्रहार’जनशक्ती पक्ष बाळदि च्या वतीने गटशिक्षण अधिकारी यांना दिले निवेदन)

सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड (दि. 4 डिसेंबर) केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा बाळदी येथे वर्ग १ ते ८ पर्यंत वर्ग आहेत.

परंतू त्या ठिकाणी शिकविण्यासाठी फक्त ५ शिक्षक आहेत. त्यात आठवा वर्ग असल्यामुळे विद्याथ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

वास्तविक ग्रामीण भागातील विदयार्थ्या च्या शैक्षणिक बाबीकडे विशेषत्वाने लक्ष देणे आवश्यक आहे.

तेंव्हा आपणास नम्र निवेदन आहे की,त्वरीत शिक्षकांची नियुक्ती देऊन शाळेच्या विद्याथ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये.
ही काळजी घ्यावी..!

या वेळी निवेदन देतांनी प्रविण इंगळे (शाखा प्रमुख बाळदि) नितीन राठोड,प्रफुल वानखडे,विवेक जळके व आदी उपस्तित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!