शहर

हिमायतनगरच्या आठवडे बाजारात पोलिसांचा धडक सर्जिकल स्ट्राइक: पीआय लक्ष्मण केंद्रे यांच्या कडक आदेशाने ७ मद्यपी दुचाकीस्वारांवर ‘कलम १८५’ अन्वये धडक गुन्हे दाखल!


​हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम):
आज बुधवारी शहरात भरलेल्या गजबजलेल्या आठवडे बाजारात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हिमायतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कारवाई करण्यात आली.
​बाजारात येणाऱ्या महिलांची सुरक्षा वाऱ्यावर राहू नये, तसेच मोबाईल चोर, पाकीटमार आणि गुन्हेगारी वृत्तीच्या हुल्लडबाजांवर वचक बसावा यासाठी बीट अंमलदार गेडाम, पोलीस अंमलदार रमेश वाघमारे, संग्राम सुरनर, शेख लायक, मोहम्मद इरफान, इम्रान खान पठाण, हाजरी मेजर नवाब खान पठाण आणि होमगार्डच्या पथकाने प्रमुख मार्गांवर पायी गस्त घालून कडक बंदोबस्त ठेवला.
​याच मोहिमेदरम्यान दारूच्या नशेत दुचाकी चालवून स्वतःचा व इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्या ७ जणांना पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतले. पोलिसांनी तात्काळ त्यांची शासकीय रुग्णालयात नेऊन वैद्यकीय तपासणी (Medical Test) व रक्ताचे नमुने घेतले.
​शासकीय वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर, मद्यप्राशन करून वाहन चालवत असल्याचे निष्पन्न झाल्याने मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १८५ अन्वये या सर्व ७ चालकांवर रीतसर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या कायद्यानुसार पहिल्या गुन्ह्यासाठी ₹१०,००० दंड किंवा ६ महिने तुरुंगवासाची तरतूद आहे.
​गुन्हेगारी कारवाया आणि वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नाही, असा सज्जड इशारा पोलीस प्रशासनाने दिला असून या धडक कारवाईमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button