Uncategorized

महेंद्र कावळे यांची फेरनिवड; शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते स्वागत


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी महेंद्र कावळे यांची फेरनिवड झाल्याबद्दल त्यांचे माजी सामाजिक न्याय मंत्री तथा ज्येष्ठ काँग्रेस नेते शिवाजीराव मोघे यांच्या निवासस्थानी स्वागत करण्यात आले.
यावेळी कावळे यांच्या फेरनिवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक व संघटनात्मक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. महागाव तालुक्यातील नागरिक व काँग्रेस कार्यकर्त्यांनीही महेंद्र कावळे यांचे स्वागत करून त्यांच्या फेरनिवडीचे स्वागत केले. त्यांच्या नेतृत्वामुळे अनुसूचित जाती विभागाला अधिक बळ मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button