शहर

जिजाऊच्या लेकींचा आक्रमक पवित्रा; नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध बॅनरला चपलांची माळ घालत ‘जोडे मारो’ आंदोलन; सरोज देशमुख यांचा इशारा — “मुलींबद्दल बोलताना जिभेवर लगाम ठेवा!”

उमरखेड : मराठा समाजातील मुली व महिलांबाबत नवनाथ वाघमारे यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ उमरखेड येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आक्रमक निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी नवनाथ वाघमारे यांच्या छायाचित्राच्या बॅनरला चपलांची माळ घालून ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी घोषणाबाजी करत संबंधित वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला.
या वक्तव्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या असून, संबंधित प्रकरणाची चौकशी करून कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश सहसचिव सरोज देशमुख यांनी आक्रमक भूमिका मांडत स्पष्ट शब्दांत इशारा दिला. त्या म्हणाल्या, कोणतीही समाजातील “मुलींबद्दल बोलताना जिभेवर लगाम ठेवा; महिलांच्या सन्मानाशी तडजोड नाही! कोणत्याही समाजातील मुलींबद्दल अशा प्रकारचे वक्तव्य केले, तर त्याचा अश्याच मार्गाने त्याचा ठामपणे समाचार घेतला जाईल.”
“जिजाऊच्या संस्कारात वाढलेल्या लेकी आपल्या माता-भगिनींचा अपमान कदापि सहन करणार नाहीत. महिलांचा सन्मान हा आमच्या स्वाभिमानाचा विषय आहे. समाजातील कोणत्याही मुली किंवा महिलेविषयी अपमानास्पद वक्तव्य करण्यापूर्वी प्रत्येकाने आपल्या शब्दांची मर्यादा लक्षात ठेवावी,” असेही सरोज देशमुख यांनी सांगितले.
महिलांच्या सन्मानाचा प्रश्न हा केवळ एका समाजापुरता मर्यादित नसून प्रत्येक स्त्रीच्या प्रतिष्ठेशी जोडलेला आहे. त्यामुळे महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका उपस्थितांनी व्यक्त केली.
महिलांच्या सन्मानासाठी शेवटपर्यंत संघर्ष करू. महिलांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही,” असा निर्धार यावेळी करण्यात आला.
या निषेध आंदोलनात सागर शिंदे, उषा खंदारे, रंजना माने, ललिता खंदारे, सुनीता देवसरकर, सुनीता ठाकरे, दिनेश रावते, अरुण ठाकरे, सुभाषराव देवसरकर, शुभम माने आणि गुलाब गजबे यांच्यासह सकल मराठा समाजातील महिला व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा महाराष्ट्र “जिजाऊच्या लेकी चाआहे. महिलांच्या सन्मानाशी तडजोड नाही!”
महिलांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या नवनाथ वाघमारे ला तर आता भेटेल तिथे असा चोप देऊच परतू कोणत्याही महिलेविषयी जो कोणी असा बोलला त्याला प्रत्यक्ष भेटून असा चोख दिला जाईल की या आंदोलनातून देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button