Uncategorized

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर प्रशासक नियुक्त; चव्हाण यांनी हाती घेतला कारभार


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची मुदत संपुष्टात आल्याने शासनाने संचालक मंडळ बरखास्त करून बँकेवर प्रशासक नियुक्त केला आहे. विभागीय सहनिबंधक यांच्या आदेशानुसार डी.डी.आर. यवतमाळ येथील चव्हाण यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
प्रशासक म्हणून नियुक्तीनंतर चव्हाण यांनी सोमवार, दि. 27 एप्रिल 2026 रोजी बँकेचा कारभार अधिकृतपणे हाती घेतला. संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर नव्या निवडणुका होईपर्यंत बँकेचा दैनंदिन व प्रशासकीय कारभार प्रशासकांच्या देखरेखीखाली चालविला जाणार आहे.
या निर्णयामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात चर्चेला उधाण आले असून बँकेच्या पुढील धोरणात्मक निर्णयांबाबत उत्सुकता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button