शहर

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला हरताळ; उमरखेडमध्ये पेट्रोल पंप प्रकरणात नियमांची पायमल्ली

जनतेच्या भावना पायदळी तुडविल्या
-बसवेश्वर क्षीरसागर

सहसंपादक शेख मुजाहिद

उमरखेड (जि. यवतमाळ) : जिल्हाधिकाऱ्यांच्या स्पष्ट आदेशानंतरही संबंधित अधिकाऱ्यांकडून अंमलबजावणी न झाल्यामुळे उमरखेड येथे पेट्रोल पंप प्रकरणात गंभीर अनियमितता उघडकीस आली आहे. या प्रकरणात शासन आदेश व अटींचे सरळ उल्लंघन होत असल्याचा आरोप अर्जदारांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पेट्रोल पंपासाठी दिलेल्या लीजचा कालावधी संपल्यानंतर नूतनीकरणासाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र, या प्रक्रियेदरम्यान आवश्यक अटी व शर्तींची पूर्तता करण्यात आलेली नाही. विशेषतः, रस्त्याच्या मध्यापासून निर्धारित अंतराच्या आत डिझेल व पेट्रोल टाक्या असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले असून त्या हटविण्याची प्रक्रिया प्रलंबित आहे.
यापूर्वी मा. जिल्हाधिकारी, यवतमाळ यांनी आदेश देऊन अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले होते. तसेच, आदेशातील अट क्रमांक ६ ची पूर्तता झाल्याशिवाय लीजची नोंदणी करू नये आणि तोपर्यंत पेट्रोल-डिझेल विक्री स्थगित ठेवावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. तरीही संबंधितांकडून या आदेशाचे पालन झाले नसल्याचे समोर आले आहे.
अर्जदार बसवेश्वर क्षीरसागर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून नियमबाह्य पद्धतीने प्रक्रिया सुरू ठेवली आहे. त्यामुळे सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या पार्श्वभूमीवर अर्जदारांनी मागणी केली आहे की,
अतिक्रमण तात्काळ हटवण्यात यावे,
अटींची पूर्तता होईपर्यंत लीज नोंदणी थांबवावी,
तसेच संबंधित पेट्रोल पंपाची विक्री त्वरित स्थगित करण्यात यावी
दरम्यान, या गंभीर प्रकरणात जिल्हा प्रशासन काय भूमिका घेणार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button