मला न्याय मिळवून द्या हो दिव्यांगाची आर्त हाक

न्यायासाठी दिनांक 15 एप्रिल पासून उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू.
सहसंपादक शेख मुजाहिद
उमरखेड :दि .१६ मला व माझ्या बहिणीला महसूल खात्यामार्फत आमच्या अर्ध्या जागे बद्दलचा वेगळा ७ /१२ नोंद घ्यावयाची आहे व वेगळा ७/११ फेरफार करून मिळावा यासाठी स्वप्निल मधुकर पाटील रा . नाथनगर हल्ली मु . चाळीसगाव तर त्यांची बहीण वृषाली मधुकर पाटील यांनी आपल्या अर्ध्या जागेचा ७/१२ वर नोंद व ७/११ व फेरफार करून मिळावा यासाठी दिनांक 15 एप्रिल पासून उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की बालाजी गंगाधर साखरे वय 34 राहणार उमरेड पोलीस स्टेशन उमरेड जि नागपूर हे पोलीस खात्यात शिपाई आहेत तसेच स्वप्निल मधुकर पाटील व त्यांची बहीण वृषाली पाटील ही सर्वजण उमरखेड नगरपरिषद हद्दीतील शेत सर्वे नंबर 10 / १ यातील आकृषक असलेला प्लॉट नंबर 15 च्या खुल्या जागेचे क्षेत्रफळ 258.87 चौरस मीटर यामध्ये बांधकाम 21. oo चौरस मीटर जागेचे व घराचे हे दोघे सामायिक मालक व दावेदार आहेत स्वप्निल मधुकर पाटील व त्यांची बहीण वृषाली व बालाजी साखरे यांनी अधि च वरील जागे बाबत खरेदी खताचे सर्वांच्या संमतीने नोंद घेऊन जागेचा व घराचा नमुना 8 असेसमेंट केला आहे व तसा नकाशा सुद्धा आहे आता स्वप्निल पाटील व बहीण वृषाली यांचे म्हणणे आहे की, महसूल खात्याने आमच्या अर्ध्या जागेबाबत वेगळा स ७/१२ नोंद घेऊन व वेगळा ७/११ व फेरफार करून द्यावा अशी मागणी स्वप्नील पाटील व त्यांची बहीण वृषाली यांनी केली असून या पूर्वी अनेक वेळा बालाजी साखरे यांना अनेक वेळा भेटून सहकार्य करण्याची विनंती केली परंतु ते पोलीस असल्याने पोलीस खात्याचा बळाचा वापर करून नेहमी धाक दाखवत आहेत व जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहेत त्यामुळे आता महसूल खात्यानेच मला जागेबाबतचा न्याय मिळवून द्यावा अशी आर्त मागणी दिव्यांग स्वप्निल मधुकर पाटील यांनी केली आहे.



