शहर

उबाठा शिवसेना उमरखेड शहरप्रमुख पदी संदीप ठाकरे यांची नियुक्ती ( पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार – संदीप ठाकरे )

सहसंपादक शेख मुजाहिद

उमरखेड :- शिवसेना उबाठा पक्षाच्या शहर प्रमुख पदी माजी नगरसेवक तथा शहरातील युवकांमध्ये लोकप्रिय असलेले संदीप ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या नियुक्तीने शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे .
शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड व जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे व किशोर इंगळे यांनी एका पत्राद्वारे संदीप ठाकरे यांची शहरप्रमुख पदी नियुक्ती झाल्याचे जाहीर केले आहे .
मागील नगरपरिषद निवडणुकीच्या दरम्यान शहर प्रमुखाचा राजीनामा झाल्यामुळे उमरखेड उबाठा पक्षाचे शहर प्रमुख पद रिक्त होते .पक्षाने जनशक्ती पॅनल तर्फे निवडणूक लढवून चार पैकी दोन शिलेदार नगरपालिकेमध्ये पाठवले .प्रभाग क्रमांक एक मध्ये उबाठाचे संदीप ठाकरे हे उमेदवार होते त्यांनी आपल्या कार्यकर्तुत्वाच्या जोरावर दोन बलाढ्य उमेदवाराला फाईट दिली यामध्ये भाजप उमेदवार व संदीप ठाकरे या दोघांना समसमान मतदान पडले होते यामध्ये ईश्वरचिठ्ठीने भाजपाचा उमेदवार विजयी झाला .
संदीप ठाकरे यांची प्रतिमा उमरखेड शहरात रुग्णसेवक तसेच जनसामान्यांच्या अडचणीला धावून जाणारा युवक म्हणून असून त्यांच्यासारख्या हूरहुन्नरी नेतृत्वाला शहर प्रमुख पद मिळाल्यामुळे पक्षातील नवयुवकांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे . त्यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे , आदित्य ठाकरे सह जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड ,जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे ,किशोर इंगळे , ऍड बळीराम मुटकुळे ,तालुकाप्रमुख सतीश नाईक , राजेश खामनेकर , निलेश जैन , राहूल सोनुने , प्रशांत पत्तेवार, राजेश कवाने, गजेंद्र ठाकरे , देवानंद भारती सह पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button