Uncategorized

हिवरा येथे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी


महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील हिवरा येथे आज दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत उपसरपंच शरद पाटील होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य तथा पॅनल प्रमुख राजूभाऊ धोतरकर, ज्येष्ठ शिवसैनिक किशोरभाऊ घाटोळे, गजान पारटकर, दत्तराव आडंगे, चयंन राठोड, विनोद खोंडे, अनिल कदम, किरण जामकर, सुनील ठाकरे, गौरव घोटाळे, संतोष चव्हाण, विनोद बोरुळकर, रजित कदम, सुदर्शन हिरेकर, राहुल बेलखेडे, पांडुरंग जाधव, संतोष वारंगे, सतू पेवकर यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी सुधीर कदम, अशोक भुसारे, राहुल आडंगे, समाधान मोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी त्यांच्या सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक कार्याचा गौरव केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button