ग्रामपंचायत तरोडामध्ये ‘पंचायतराज समृद्ध अभियाना’ला गती

- बीडीओ किरण कोळपे यांची तरेडा येेथे सदिच्छा भेट; विकासकामांना दिले स्पष्ट दिशा-सूत्र
सहसंपदा शेख मुजाहिद मो.7798306192
उमरखेड तालुक्याील ग्रामपंचायत तरोडा येथे महाराष्ट्र शासनाच्या पंचायतराज समृद्ध अभियानाला चालना देण्यासाठी पंचायत समिती उमरखेडचे गटविकास अधिकारी किरण कोळपे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थांना अभियानाच्या उद्दिष्टांबाबत सखोल मार्गदर्शन करत ग्रामविकासाच्या दृष्टीने ठोस दिशा दिली.
कोळपे यांनी पंचायतराज व्यवस्थेला अधिक सक्षम, पारदर्शक व लोकाभिमुख बनविण्यासाठी ग्रामपंचायतींनी विकासात्मक कामांवर भर देण्याचे आवाहन केले. स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, डिजिटल सेवा तसेच शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सशक्त ग्रामसभा म्हणजेच तळागाळातील लोकशाहीचे खरे बळ, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी ग्रामपंचायतीच्या सुरू असलेल्या व प्रस्तावित विकासकामांचा आढावा घेण्यात आला. समृद्ध अभियानांतर्गत नाविन्यपूर्ण व लोकहिताचे उपक्रम राबवून तरोडा ग्रामपंचायत आदर्श ठरावी, अशा शुभेच्छा कोळपे यांनी दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनामुळे ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून विकासकामे अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार करण्यात आला.
या सदिच्छा भेटीप्रसंगी युवा सेना तालुकाध्यक्ष कपिल पाटील, सरपंच सौ. वैशाली संदीप खंडाळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.
या भेटीमुळे ग्रामपंचायत तरोडा येथील विकासकार्यांना नवी दिशा व प्रेरणा मिळाल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.



