महाराष्ट्र

पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बंधूंना हार्दिक शुभेच्छा ! आजपासून तब्बल १९१ वर्षांपूर्वी, म्हणजेच ६ जानेवारी १८३२ रोजी मराठी पत्रकारितेचे आद्य जनक श्री. बाळशास्त्री जांभेकर यांनी


‘दर्पण’ हे नियतकालिक सुरू करून
मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली.
मराठीतील पहिले पत्रकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
श्री. बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ
आजचा दिवस ‘पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो.
‘दर्पण’ नियतकालिकाचे वैशिष्ट्य म्हणजे—
ते एकाच वेळी मराठी आणि इंग्रजी वाचकांसाठी प्रकाशित केले जात होते.
एक कॉलम मराठी वाचकांसाठी,
तर दुसरा कॉलम इंग्रजी वाचकांसाठी राखीव होता.
जनतेच्या भावना आणि प्रश्न
थेट शासनकर्त्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचावेत,
या उद्देशाने जांभेकरांनी इंग्रजी कॉलमची दूरदृष्टीने व्यवस्था केली होती.
जांभेकरांनी सुरू केलेली मराठी पत्रकारिता
काळानुरूप अधिक व्यापक, सक्षम आणि प्रगल्भ होत गेली.
आजवरच्या वाटचालीत
मराठी पत्रकारितेने
राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक
आणि लोकशाही व्यवस्थेच्या
असंख्य क्षेत्रांत मोलाचे योगदान दिले आहे.
या संघर्षमय प्रवासात
अनेक पत्रकारांना
प्रस्थापितांच्या रोषाला सामोरे जावे लागले,
राजकीय व सामाजिक दबाव सहन करावा लागला,
प्रसंगी आपला जीवही गमवावा लागला.
आजही अनेक पत्रकार
आपला जीव मुठीत धरून
सत्यासाठी लढत आहेत.
अशा सर्व भूतपूर्व पत्रकारांना विनम्र अभिवादन
आणि
आज कार्यरत असलेल्या सर्व पत्रकार बंधू-भगिनींना
पत्रकार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
✍️ संजय नागरगोजे महासागर तालुका प्रतिनिधी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button