शहर
उमरखेड येथे सावित्रीबाई ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त मानवंदना

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
आज उमरखेड येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन व मानवंदना अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमास उमरखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा तेजश्रीताई, विधी तज्ञ संतोष जैन, तसेच नवनिर्वाचित नगरसेवक व विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या महान कार्यास उजाळा दिला. स्त्री शिक्षण, सामाजिक समता व महिला सक्षमीकरणासाठी सावित्रीबाई फुले यांनी दिलेल्या योगदानाबाबत उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी शहरातील विविध सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी केला.



