शहर

पायगुणा” की अपशकुन? उमरखेड–महागाव मतदारसंघातील आमदारांचे पीए अमोल वडगिरे वादाच्या भोवऱ्यात जिथे जिथे गेले, तिथे सत्ता, पद आणि प्रतिष्ठेची राखरांगोळी! उमरखेड–महागाव

| विशेष महागाव प्रतिनिधी
“एखाद्याच्या पायगुणा पायी चांगल्या-चांगल्यांची पदे जातात” असे म्हटले जाते. उमरखेड–महागाव मतदारसंघात ही म्हण अक्षरशः खरी ठरत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. आमदारांचे पीए अमोल वडगिरे यांच्या कामगिरीवरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
यापूर्वी अमोल वडगिरे यांनी शरद मैन यांचे काम पाहिले. मात्र त्यानंतर शरद मैन यांना पद व प्रतिष्ठा गमवावी लागली. पुढे उमरखेड येथे नितीन भुतडा व आमदार वानखेडे यांचे पीए म्हणून काम पाहत असतानाच, नितीन भुतडा यांना उमरखेड नगरपालिकेत दारुण पराभव स्वीकारावा लागला. बहुमताने पराभूत होऊन संपूर्ण सत्ता हातातून गेली.
या पार्श्वभूमीवर, “ही केवळ योगायोगांची साखळी आहे की पीएंचा ‘पायगुणा’?” असा सवाल उमरखेड–महागाव मतदारसंघात उघडपणे विचारला जाऊ लागला आहे.
इतकेच नव्हे तर, संबंधित पीए वृत्तपत्रांना जाहिराती देतात, मात्र पैसे देत नाहीत, असा गंभीर आरोपही पत्रकार व व्यापारी वर्गातून होत आहे. असे पीए नेमके कोणाच्या कामाचे? असा संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मतदारसंघातील नागरिकांचे म्हणणे आहे की, लोकांच्या समस्या, गरजू रुग्ण, विशेषतः कॅन्सरसारख्या गंभीर आजारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मिळणारे सहकार्य — हे सर्व कागदावरच दिसते. प्रत्यक्षात मात्र आमदारांच्या पीएंकडून किंवा आमदारांकडूनही कोणतेही ठोस सहकार्य मिळत नसल्याचे वास्तव समोर येत आहे.
गरजू रुग्णांना दारोदारी फिरावे लागत असताना, पीए कार्यालयात मात्र मौन आणि उदासीनता पाळली जात असल्याचा आरोप नागरिक खुलेपणाने बोलून दाखवत आहेत.
अशा परिस्थितीत, “असे पीए पुढे आणखी कोणाला भुईसपाट करणार?” हा प्रश्न संपूर्ण उमरखेड–महागाव मतदारसंघात चर्चेचा विषय ठरला आहे. महागावतले कार्यालय गायब झाले आहे .आता तरी आमदार याबाबत भूमिका स्पष्ट करणार का, की जनता पुढील निकालातून उत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button