महाराष्ट्र

ठाणे क्राईम ब्रँचची महागावमध्ये धडक; चुरमुरा येथील महिलेस अटक, 60 ग्रॅम सोने जप्त


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
ठाणे क्राईम ब्रँचच्या पथकाने मंगळवारी महागाव शहरात अचानक धडक देत मोठी कारवाई केली. या कारवाईत उंबरखेड तालुक्यातील चुरमुरा येथील मूळ रहिवासी असलेल्या एका महिलेस ताब्यात घेण्यात आले असून तिच्याकडून 60 ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले आहे. ज्या गाडीने आरोपीला महागाव पोलीस स्टेशनमध्ये आणले होते ते गाडी व आरोपी पोलीस स्टेशन आवारात उभी असताना ही माहिती घेण्यात आली.
सदर महिला ठाणे येथील हिरानंदानी कॉलनी परिसरात काम करत होती. तपासादरम्यान संशयित महिलेने हे सोने महागाव येथील एका सराफी व्यावसायिकाकडे गलाई (विक्री) केल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित सोने जुने असल्याचे सांगत तिने व्यवहार केल्याचे निष्पन्न झाले आहे.
या व्यवहारात सुमारे नऊ लाख रुपयांच्या सोन्याची उलाढाल झाल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. त्यानंतर ठाणे क्राईम ब्रँचने महागाव शहरातील विविध सराफी दुकानदारांची चौकशी केली असता, एका गलाईदाराने सदर सोने घेतल्याचे स्पष्ट झाले. त्याच्याकडून 60 ग्रॅम सोने पोलिसांनी जप्त केले आहे.
या प्रकरणी ठाणे क्राईम ब्रँचने महागाव येथील एका व्यक्तीलाही ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. आरोपी महिला सध्या पोलिस ताब्यात असून या कारवाईबाबत माहिती ठाणेदार धनराज निळे यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button