संस्कार पोदार लर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलविले हास्य अंध दिन/ पांढरी काठी दिनाचे औचित्य साधून दिव्यांग विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ आणि शालेय साहित्याचे वाटप

भारताचे राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती दिनी वाचन प्रेरणा दिन साजरा
शेख मुजाहिद सह-संस्थापक
उमरखेड दि.१५/१०/२०२५ सततच वैविध्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांची सर्वांगीण विकासाची प्रगती करणारी उपक्रमशील शाळा म्हणून गणल्या जाणाऱ्या उमरखेड येथील संस्कार पोदार लर्न स्कूल ने यावर्षी उमरखेड तालुक्यातील दोन दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ त्याचप्रमाणे शालेय साहित्याचे वाटप केले.
स्वर्गीय वसंतराव नाईक अंध मूकबधिर व अपंग शिक्षण संस्था वसंत नगर पोफाळी तसेच श्री शिवाजीराव मोघे निवासी अपंग विद्यालय उमरखेड या शाळेतील सर्व दिव्यांग विद्यार्थी बांधवांना जागतिक अंध दिन व पांढरी काठी दिनाचे औचित्य साधून संस्कार पोदार लर्न स्कूलच्या वर्ग १ ते १० च्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी दिवाळी सणानिमित्त फराळाचे साहित्य तसेच शालेय साहित्य वाटप करून दिव्यांग विद्यार्थी बांधवांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले, त्याचप्रमाणे आज भारताचे राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली याप्रसंगी अंध बांधव शालेय शिक्षणात वाचन लेखन कसे करतात याचे प्रत्यक्ष पोदार स्कूलच्या विद्यार्थ्यांना बघावयास मिळाले. संस्कार पोदार लर्न स्कूल तर्फे राबविलेल्या या अभिनव उपक्रमास विद्यार्थ्यांसह पालकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. दिव्यांग विद्यार्थी बांधवांना दिवाळी सणाचे निमित्याने फराळाचे तसेच शालेय साहित्याचे वाटप करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे उधान दिसून आले. आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना संस्कार पोदार लन्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तसेच त्यांच्या पालकांनी दिवाळीनिमित्त दिलेल्या या अभिनव भेटीमुळे विद्यार्थ्यांसह आम्ही सर्व शिक्षक वृंद भारावून गेलो असल्याचे वक्तव्य निरोप घेतेवेळी दोन्ही शाळेतील शिक्षक वृंदांनी केले. सदर समाजशील उपक्रमाचे उत्तम रित्याआयोजन करून आजच्या दिवाळी सणाचे निमित्याने फराळ व शालेय साहित्याचे वाटप करण्याकरिता संचालक मंडळाचे मार्गदर्शनाखाली प्रिन्सिपल बी.व्ही.मुंजाळ प्रशासकीय अधिकारी अतिश दिघेवार यांचे सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल संचालक मंडळाने त्यांचे कौतुक केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील ओसंडून वाहणारा आनंद वाखाणण्यासारखा होता.
चौकट
पालकांच्या प्रतिक्रिया
संस्कार पोदार लर्न स्कूल ने आज जो उपक्रम राबविला त्या उपक्रमात विद्यार्थ्यांसह आम्हाला सुद्धा सहभागी होता आले याचा मनाला आनंद वाटतो आहे विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच समाजात असणाऱ्या अशा घटकापर्यंत आपण कशा रीतीने मदत सहकार्य करून त्यांच्या जीवनात आनंद निर्मिती करू शकतो हे या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिकावयास मिळत असल्याने ही शिदोरी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात उपयोगी पडेल यात शंका नाही अशा कार्यक्रमाचे नित्य नियोजन केले जावे आणि त्यात आम्हालाही सहभागी होण्याची संधी द्यावी अशा भावूक शब्दांमध्ये पालकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.



