महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक शाळेत पालक–शिक्षक सहविचार सभा संपन्न….

शेख मुजाहिद सह-संस्थापक
यांजकडून दि. ४ ऑक्टोबर 2025.
आज महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक शाळेत पालक–शिक्षक सहविचार सभा उत्साहात संपन्न झाली.प्रथम महिला शिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून सभा प्रारंभ झाली. या सभेचे अध्यक्षस्थान गजानन नारायण वानखेडे यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून शालेय व्यवस्थापन समिती सदस्या रक्षाताई माने,अविनाश कुंटे , पालक प्रतिनिधी,विक्रम माखणे तसेच परिवहन समितीचे अध्यक्ष निरंजन भाऊ वानखेडे उपस्थित होते.
सभेमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांविषयी चर्चा घडून आली. शाळेच्या मुख्याध्यापिका पेंदे मॅडम यांनी पालकांना मार्गदर्शन करताना शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत पालकांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.
युवा पत्रकार गजानन वानखेडे यांनी अध्यक्षस्थाना वरून बोलतांना सांगितले की, मी स्वतः तीन वर्षे अध्यापनाचे पवित्र कार्य सम्यक दृष्टी विद्यालय मुळावा शाळेत शिक्षक म्हणुन खाजगी टेम्पररी नौकरी केली.
विद्यार्थी विद्यार्थिनींना शिक्षणाबरोबर संस्कार सुद्धा आई वडिलांनी टाकावेत, गुरुजन वर्गाना मान सन्मान पूर्वक बोलून मुलांच्या गृहपाठ बद्दल चौकशी करावी, आजच्या काळात मराठी शिक्षण द्या, पण दर्जेदार शिक्षण द्या, नौकरीच्या मागे न लागता, प्रगतशील शेतकरी, मोठा व्यापारी, उद्योजक कसा होईल याकडे पण लक्ष द्यावे. भारत देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी सरकारी मराठी शाळेत शिक्षण घेतले,वयाच्या साठ वर्षांतर मिसाईल मॅन म्हणून त्यांची ओळख जगभर पसरली. आजच्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता, भरपूर मेहनत घावी, त्याचे फळ आज उद्या मिळते, फक्त संयम ठेवावा, त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वर्गाबाहेर बसून शिक्षण घेतले व जगातील सर्वात मोठी हस्तलिखित राज्यघटना लिहिली.अशा प्रकारे स्पष्ट विचार सामाजिक कार्यकर्ते आजच्या कार्यक्रम चे अध्यक्ष गजानन नारायण वानखेडे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.क्रांती पवार यांनी, प्रास्ताविक नितीन वानरे यांनी केले, शाळेत विविध प्रकारचे उपक्रम आम्ही शाळेत सातत्याने राबवतो,सैनिकांना रक्षाबंधन वेळी राखी पाठवणे, काळ्या मातीच्या मुर्त्या बनवणे, त्याच बरोबर स्पर्धा परीक्षा, मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आमचे सर्व कर्मचारी वृंद मेहनत घेत असतो नितीन वानरे यांनी प्रास्ताविकेत सांगितले.पेंदे मॅडम यांनी विद्यार्थी यांचे आम्ही प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर आहोत, मुली, मुलांच्या पालकांनी आम्हाला बिनधास्तपणे अडी अडचणी सांगाव्यात असे सांगितले.मुलांचे नाव मोठे झाले म्हणजे आमच्या शाळेचे नाव मोठे होईल असे सांगितले.
त्याचबरोबर विद्यार्थी, विद्यार्थिनी यांची आपल्या शाळेत प्रगती प्रोग्रेस 100% करू असे रक्षाताई माने यांनी आश्वासन दिले.सर्व पालक, महिला यांनी आपल्या पाल्यांच्या समस्या आजच्या शिक्षक पालक सहविचार सभेत सांगितल्या.
यावेळी रेखा पाईकराव, दाभाडकर मॅडम, भारती सर, आदी सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.तर आभार प्रदर्शन कु. मीनल शिवणकर यांनी मानले.
चौकट:- राजू चंद्रवंशी (पालक )पावसाळ्याच्या दिवसात शाळेसमोर भरपूर पाणी साचल्याने विद्यार्थी विद्यार्थिनींना वर्गात जाताना त्रास होत आहे, त्यामुळे पाणी साचणार नाही याची दक्षता त्वरित शाळा व्यवस्थापन समिती यांनी घ्यावी. नगर परिषद उमरखेड मुख्याधिकारी यांना योग्य ती उपाययोजना करण्यास सांगू असे रक्षाताई माने यांनी सांगितले.



