विशेष

पोफाळी सर्कलमधील अनेकांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

शेख मुजाहिद सह-संस्थापक
उमरखेड : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजस्थानी भवनात 29 सप्टेंबरला झालेल्या काँग्रेसच्या आढावा बैठकीत, पोफाळी सर्कल मधील अनेकांचा कॉग्रेस श्रेष्ठींच्या उपस्थितीत पक्षात जाहीर प्रवेश झाला. यामुळे पोफाळी सर्कल मधील काँग्रेसची ताकद अधिक भक्कम होतांना दिसत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर झालेल्या आढावा बैठकित सदर प्रवेश सोहळा पार पडला. जिल्हा परिषद पोफाळी सर्कल मधील अनेकांनी काँग्रेस पक्षावर विश्वास दाखवीत प्रवेश घेतला. सदर बैठकीचे अध्यक्ष म्हणून काँग्रेस नेते तातु देशमुख, निरीक्षक चंद्रकांत साठे, माजी अर्थ व बांधकाम सभापती राम देवसरकर, तालुका अध्यक्ष दत्तराव शिंदे , शहर अध्यक्ष नंदकिशोर अग्रवाल, गोपाल अग्रवाल, माजी सभापती डॉ विठ्ठलराव चव्हाण, महेंद्र कावळे, महिला अध्यक्ष सुर्यकांता दिंडाळकर, पोफाळी सर्कलच्या सामाजिक कार्यकर्त्या पुजाताई अंबादास धुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रमुख पक्ष श्रेष्ठींच्या उपस्थितित पार पडलेल्या पक्ष प्रवेशात, माजी सरपंच गजानन कुरकुटे व परसराम राठोड , ग्रामपंचायत सदस्य आनंदराव कवाने व सचिन धुळे, माजी सदस्य तातेराव काळबांडे, भगवानराव हिंगाडे सर , सामाजिक कार्यकर्ते अग्निवेश शिंगाडे,बाबू सिंग तांबसकर, समाधान भुसारे, सुशील भोरे, जयदेव हिंगाडे, निशांत भुसारे, भास्कर चव्हाण, आशिष हिंगाडे, शिवाजी जामकर, बाळू काशिदे, निलेश गायकवाड, मंगेश ठाकरे, मंचक धुळे, गजानन चव्हाण अदी कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी पोफाळी सर्कल मधील
कारभारी बाहुलबुधे, कैलास ठाकरे, कैलास चव्हाण, जयंत गायकवाड, तुळशीराम धुळे, विजय खंडाळे, ओम चव्हाण, मंचक देशमुख, देवबाजी धुळे, दिलीप धुळे, पांडुरंग ठाकरे, विश्वनाथ धुळे, अंबादास धुळे, संभाजी शिंदे, सदाशिव ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button