शहर

नियंत्रण आणा ,डीजेवर बंदी नकोशिवसेना (शिंदे ) पक्षाची पत्रपरिषदेत मागणी

[लाडक्या भावांनी दिलेले पैसे लाडक्या बहिणी बाधित शेतकऱ्यांना देणार सपना चौधरी महीला शहर प्रमुख आव्हान

शेख मुजाहिद सह-संस्थापक

उमरखेड :ध्वनी प्रदुषणाला अनेक संयत्र कारणीभूत आहेत यामध्ये केवळ डीजेलाच दोष देण्यात अर्थ नाही .उमरखेड उपविभागीय अधिकाऱ्यांनी डीजे बंदी बाबत काढलेला आदेश हा सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक तत्त्वांना छेद देणारा ठरणार असून सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक तत्वानुसार डीजेच्या आवाजावर नियंत्रण ठेवा, बंदी नको , पारंपारिक पद्धतीने सर्व मर्यादा पाळून सण उत्सव साजरे करण्यास प्रशासनाने बाधा आणू नये अशी मागणीशिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने स्थानिक विश्रामगृहावर बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे .
यावेळीपत्र परिषदेत बोलताना शिवसेना शहर प्रमुख एड .संजय जाधव म्हणाले की ,ध्वनी प्रदूषण हेआवाजाच्या मर्यादा ओलांडल्यानंतर घरातील टीव्ही मोबाईल यापासूनही होत होत आहे .सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार एक टॉप एक बेस या पद्धतीने आवाजावर मर्यादा ठेवून डीजे वाजविल्यास कुठलाही त्रास होत नाही व उत्साह द्विगुणीत होतो . महाराष्ट्रात कुठेही डीजे बंदी नाही ऐन दुर्गोत्सवात एकट्या उमरखेड मध्ये डीजे बंदी करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी यांनी सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक तत्त्वांना छेद देत काढले आहेत .ते राष्ट्रपती नाहीत असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला .कारण पारंपारिक वाद्य इतिहास जमा झाल्यात जमा आहेत . त्यामुळे दुर्गोस्तवात पारंपारिक वाद्य नसल्याने मिरवणुकीचा हिरमोड होईल याकरिता डीजेच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक टॉप एक बेस अवलंबवावी ,बंदी नको असे एडवोकेट संजीव कुमार जाधव यांनी स्पष्ट केले .त्याचबरोबर त्यांनी डीजे बंदी बाबत आलेल्या निवेदनाची तात्काळ दखल घेत उपविभागीय अधिकाऱ्यांनी तालुक्यात डीजे बंदीचा आदेश काढला आहे .वास्तविक पाहता उमरखेड शहरामध्ये गांजा ,गुटखा विक्री बाबत थेट पुराव्यासह निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाकडून गांजा बंदी बाबत कुठल्याही प्रकारचा निर्णय होत नाही तसेच वाहतुकीची समस्या कायमस्वरूपी ‘आ ‘ वासून आहे . ट्राफिक पोलीस शाळा परिसरात कुठेही शाळा सुटल्यानंतर आढळून येत नाही अशा भेडसावत असलेल्या समस्या बाबत निर्णय घेण्यास प्रशासन लेचीपेची भूमिका घेते अशी प्रशासनाच्या धोरणाबाबत टिका केली .यापत्र परिषदेला नगरपरिषद प्रचार प्रमुख अनिल नरवाडे बसवेश्वर क्षीरसागर दामोदर इंगोले विनायक बोरकर सुभाष बाभुळकर यांच्यासह शिवसेना महिला शहर प्रमुख सपना चौधरी शहर समन्वयक मंजुषा नरवाडे उपशहर प्रमुख ज्योती सुरोशे ,सारिका कोकांडे कल्पना भालेराव ज्योती जोगदंड मीनल सुलभेवाड संगीता धापे आदी महिला पदाधिकारी ब असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
चौकट :
शिंदेच्या लाडक्या बहिणी देणार पुरग्रस्त शेतकऱ्यांना एक महिन्याचे मानधन
राज्यात अतिवृष्टीने थैमान घालून महापुराने अनेक संसार उध्वस्त झाले खरीप हंगामातील तसेच बारमाही पिके संपूर्णतः नष्ट झालेली असताना बळीराजावर अस्मानी संकट कोसळल्यामुळे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या लाडक्या बहिणींनी आपले दरमहा मिळणाऱ्या लाडक्या बहीण योजनेच्या मानधनातून एक महिना मानधन संकटात सापडलेल्या पूर बाधित शेतकऱ्यांना जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्यामार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पाठविण्याचा निर्णय शिवसेनेच्या किती 46 महिला पदाधिकाऱ्यांनी व नोंदणीकृत जवळपास अडीच हजार सदस्य भगिनी यांनी घेतला असल्याचे शिवसेनेच्या महिला शहर प्रमुख सपना चौधरी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button