Uncategorizedविशेष

महागाव तालुक्यात जनावर चोरीचा सुळसुळाट; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात जनावर चोरीचे प्रकार वाढत असून चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले आहे. गुरुवारी सायंकाळी मोहदी मार्गालगतच्या शिवारातून पाच गाई अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे.
या चोरीमध्ये
गजानन भागवत खंदारे यांची १ गाय,
मारुती विठ्ठल गावंडे यांची २ गाई,
राहुल संजय दुपारते यांची १ गाय,
कैलास काळे यांची १ गाय
अशा एकूण पाच गाई चोरीस गेल्या आहेत.
या घटनेबाबत संबंधित शेतकऱ्यांनी महागाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे. विशेष म्हणजे याआधीही गुंज गावातून एक गाय चोरीला गेली होती, त्यामुळे तालुक्यात जनावर चोरीचे प्रकार वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.
थंडीचा फायदा घेत चोरटे कोठ्याच्या जाळ्या तोडून किंवा जनावरे मोकळ्या शिवारातून मालवाहू वाहनाद्वारे पळवून नेत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. त्यामुळे ही चोरी एकाच टोळीने (गँगने) सुनियोजित पद्धतीने केल्याचा संशय शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
जनावर चोरीमुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक आघात होत असून, चोरट्यांच्या मुसक्या आवळून तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. अन्यथा येत्या काळात चोरीचे प्रकार आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button