Uncategorized

उमरखेडच्या लेकीचा राष्ट्रीय झेंडा उंचावला वीरा बंग हिला ‘ज्युनिअर मिस इंडिया’चा मानाचा मुकुट

  • उमरखेडच्या कन्येने देशपातळीवर आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवत मानाचा मुकुट आपल्या शिरपेचात रोवला आहे. बंग परिवाराची कन्या वीरा मुकेश बंग हिने ‘ज्युनिअर मिस इंडिया २०२६’ (८ ते १० वयोगट – सांस्कृतिक फेरी) हा प्रतिष्ठेचा किताब पटकावत उमरखेडसह संपूर्ण नागपूर जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे.
  • अवघ्या ९ वर्षांची वीरा बंग ही उमरखेड येथील डॉ. मुकेश बंग व डॉ. स्मिता बंग यांची कन्या असून, राधेश्यामजी बंग व पद्मावती बंग यांची नात आहे. ती सध्या भवन्स बी. पी. विद्यालय, आष्टी (नागपूर) येथे इयत्ता चौथीत शिक्षण घेत आहे.
  • ज्युनिअर मिस इंडिया २०२६ ही जगातील सर्वात मोठ्या बालिकांसाठीची प्रतिष्ठित स्पर्धा मानली जाते. ही स्पर्धा ६ ते ८ जानेवारी २०२६ दरम्यान जयपूर (पिंक सिटी) येथे पार पडली. देशभरातून निवड झालेल्या १७२ स्पर्धकांनी अंतिम फेरीत सहभाग घेत आपल्या संस्कृतीचे, आत्मविश्वासाचे व व्यक्तिमत्त्वाचे सादरीकरण केले.
  • सांस्कृतिक फेरीत वीरा बंग हिने हिंदू संस्कृतीतील आदिशक्ती ‘देवी काली’चे प्रभावी रूप साकारत परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. स्त्रीशक्ती, आत्मसन्मान व धैर्याचे प्रतीक असलेल्या देवी कालीच्या सादरीकरणातून
  • “प्रत्येक स्त्रीमध्ये कालीची शक्ती दडलेली आहे; सन्मानाला आव्हान मिळाल्यास ती अग्नीसारखी उभी राहते,”
  • हा सशक्त संदेश तिने अत्यंत प्रभावीपणे मांडला.
  • आपल्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण, बुद्धिमत्ता, करिष्मा व सशक्त अभिनयाच्या जोरावर वीरा बंग हिने हा बहुमान पटकावत महाराष्ट्र व नागपूरचे राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व केले.
  • या घवघवीत यशाबद्दल वीरा बंग हिचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. ही कामगिरी उमरखेडसाठी अभिमानास्पद असून, अनेक बालकांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरणारी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button