Uncategorized

पैनगंगा नदीत अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

  • बिटरगाव पोलिसांकडून ओळख पटविण्याचे आवाहन


उमरखेड :-
तालुक्यातील बिटरगाव पोलिस स्टेशन हद्दीतील मौजे मुरली, सहस्रकुंड परिसरात पैनगंगा नदीच्या पात्रात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर घटनेप्रकरणी पोलीस स्टेशन बिटरगाव येथे अपराध क्रमांक 02/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 103 व 238 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दि. 09 जानेवारी 2026 रोजी पैनगंगा नदीपात्रात पाण्यात तरंगत असलेले प्रेत नागरिकांच्या निदर्शनास आले. माहिती मिळताच बिटरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला. प्राथमिक पाहणीत मृतक पुरुष जातीचा असून वय अंदाजे 30 ते 40 वर्षांच्या दरम्यान असल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतकाचा वर्णन पुढीलप्रमाणे आहे—वर्ण गोरा, उंची सुमारे 5 फूट 8 इंच, उजव्या हाताच्या मनगटाला लाल-केसरी रंगाचा दोरा, कमरेला लाल रंगाचा करदोडा, डोक्यावर काळे केस. मृतकाच्या अंगात पांढऱ्या रंगाची टी-शर्ट असून त्यावर “उद्धव बाळासाहेब ठाकरे” व मध्यभागी “नागेश पाटील आष्टीकर” असे नाव व मशाल चिन्ह आहे. तसेच भुरकट रंगाची फॉर्मल फुल पॅन्ट व लाल-कथ्था रंगाचे अंडरवेअर आढळून आले आहे. दोन्ही हात व पाय शाबूत आहेत.
सदर मृतकाची ओळख अद्याप पटलेली नसून, या वर्णनाशी संबंधित कोणतीही माहिती असल्यास किंवा आपल्या परिसरात कोणी व्यक्ती बेपत्ता असल्याची तक्रार असल्यास तात्काळ उमरखेड अथवा बिटरगाव पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. घटनेच्या अनुषंगाने मृत्यूचे कारण शोधण्यासाठी तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button